---Advertisement---

सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’

Usman Khawaja and David Warner
---Advertisement---

सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेचा चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला आणि अनिर्णीत राहीला. या सामन्याचा सामनावीर हा किताब उस्मान ख्वाजाला मिळाला. सिडनीमध्ये उस्मान ख्वाजाने २०१९ नंतरचा पहिला कसोटी सामना खेळला होता आणि दोन्ही डावात शतक ठोकून इतिहास रचला. क्रिकेटमध्ये ख्वाजाच्या शानदार पुनरागमनाने सलामीवीर डेविड वाॅर्नर भावुक झालेला दिसला. 

उस्मान ख्वाजा हा सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतक लगावणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला, तर कसोटी सामन्यांत अशी कामगिरी करणारा ७० वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे वॉर्नर खूश झाल्याचे दिसत आहे. त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक छायाचित्र शेअर करत त्याच्या भावना मांडल्या आहेत. त्या छायाचित्रामुळे फक्त चाहतेच नाही तर क्रिकेटप्रेमी सुद्धा भावुक झालेले दिसले.

डेविड वॅार्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या छायाचित्रात ख्वाजा आणि डेविड वाॅर्नरची मुली दिसल्या. वॅार्नरने लिहिले आहे की, “बालपणीचा भाऊ (मित्र), आणि आता वडील आणि मला उस्मान ख्वाजाच्या शानदार पुनरागमनाचा अभिमान वाटत नाही. आम्ही आमच्या भावांना क्रिकेट खेळताना पाहून क्रिकेट एकत्र खेळायला शिकलो. वेव्हरली ओवलच्या भिंतीवर चेंडू आदळवत आम्ही क्रिकेटला सुरुवात केली. आम्हाला आवडणारा खेळ खेळत आम्ही मोठे झालो. आत्ता आम्ही एकाच संघात एकत्र खेळण्याचे स्वप्न पूर्ण करत आहोत, तेही वडील म्हणून. स्वप्न अशीच पूर्ण होतात. त्या आपल्या कुटूंब आणि मित्रमैत्रिणींसोबत आनंद घ्या.”

https://www.instagram.com/p/CYgPwlILtbY/

वॉर्नरच्या या भावनिक पोस्टवर त्याची पत्नी कँडिस वॉर्नर हीने म्हटलं आहे की, “हे अगदी तसंच आहे जसं आपल्याला हवं असतं.” तसेच अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान याने हार्टचा इमोजी टाकत भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या पोस्टला चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.

ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना १४ जानेवारीला होबार्ट येथे होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असेल. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने ३-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. आता शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंड विजय मिळवत प्रतिष्ठा राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर ऑस्ट्रेलिया त्यांचे वर्चस्व कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स

भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद

भारतीय संघाकडून कोच राहुल द्रविडचा ४९ वा वाढदिवस दणक्यात साजरा, फोटो होतायेत व्हायरल

व्हिडिओ पाहा –

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---