---Advertisement---

‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, या कर्णधाराने फुंकले रणशिंग

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम एप्रिल-मे दरम्यान खेळवला जाईल. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली. आयपीएलमधील मजबूत संघांपैकी एक असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधाराने आपण आगामी हंगामासाठी सज्ज असल्याचे बोलून दाखवले आहे. त्याने सोशल मीडियावरून संदेश पाठवत, आपला संघ आगामी हंगामात विजयी होईल, अशी आशा व्यक्त केली.

डेव्हिड वॉर्नरचा इंस्टाग्रामवरून संदेश

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर असलेला डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून सनरायझर्स हैदराबाद संघाचे मैदानावर उतरत असतानाचे छायाचित्र शेअर करत लिहिले, ‘सनरायझर्स हैदराबाद एक विलक्षण संघ आहे. चाहते, कर्मचारी, खेळाडू आणि ग्राउंड स्टाफ हैदराबादमध्ये सर्व काही उत्कृष्ट आहे. पुढच्या मोसमात मी संघाला विजेते बनवण्यासाठी आतुर आहे.’

त्याच्या या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CLquDMlLi3S/

सोशल मीडियावर व्यस्त असतो वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर सातत्याने सोशल मीडियावर व्यस्त असलेला दिसतो. अनेक भारतीय गाण्यांवर तो आपली पत्नी व मुलींसह नृत्य करताना दिसला आहे. तसेच, अनेक भारतीय सेलिब्रिटींचे चेहरे लावून त्याने अनेक छायाचित्रे शेअर केली होती. वॉर्नरचे भारतामध्ये असंख्य चाहते असल्याने तो भारताला आपले दुसरे घर मानतो.

दुखापतग्रस्त आहे वॉर्नर

सन २०१६ मध्ये आरसीबीला आयपीएलच्या अंतिम सामन्यात ८ धावांनी पराभूत करून ३४ वर्षीय डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबाद विजेता ठरला होता. मागील वर्षी डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने प्ले-ऑफपर्यत मजल मारली होती. सुरुवातीच्या सामन्यात अपयशी ठरलेला वॉर्नरनंतर फॉर्ममध्ये आला होता.

डेव्हिड वॉर्नर सध्या ग्रोईन दुखापतीतून सावरत आहे. वॉर्नरला ही दुखापत गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत झाली होती. वॉर्नरला या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी ६ महिने लागू शकतात. मात्र, ४ मार्चला देशांतर्गत क्रिकेटमधून तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या सामन्यात होणार धावांची लयलूट? खुद्द बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खेळपट्टीबद्दल खुलासा

शिखर फॉर्ममध्ये आला रे !! विजय हजारे ट्रॉफीत तुफानी दीडशतक, एकट्याच्या बळावर पाजले महाराष्ट्राला पाणी

सचिन, लारा, पीटरसनसह ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ स्पर्धेत ‘या’ दिग्गजांचा समावेश; पाहा सर्व संघांची यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---