ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या दुखापतीशी झुंजतो आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताविरुद्ध मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत वॉर्नर फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाला होता. मिड ऑफच्या दिशेने येणारा चेंडू अडवताना तो मैदानात पडला होता आणि त्याला ग्रोईन इंज्युरी झाली होती.
या दुखापतीमुळे त्याला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेला तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र शेवटच्या दोन कसोटी सामन्यात पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही तो खेळला होता. मात्र आता या निर्णयाबद्दल पश्चाताप होत असल्याचे वक्तव्य वॉर्नरने केले आहे.
“मैदानावर परतण्याची घाई केली”
बुधवारी आपल्या दुखापतीबाबत बोलताना वॉर्नरने आपण मैदानावर परतण्याची घाई केल्याचे मान्य केले. तो म्हणाला, “ही घाई केल्याने मी उलट अजून काही पावले मागे गेलो. याबाबत पुन्हा विचार केल्यावर मला असं वाटतंय की माझ्या दुखापतीचा विचार करता मी हे नव्हते करायला पाहिजे. त्यावेळी नकार दिला असता तर दुखापतीतून सावरण्यासाठी मला अधिक वेळ मिळाला असता.”
“२०२३चा विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य”
मात्र आता दुखापतीतून सावरत असलेल्या या स्फोटक सलामीवीराची नजर २०२३च्या वनडे विश्वचषकावर आहे. भारतात होणारा हा विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाला जिंकवून देण्याचे वॉर्नरचे लक्ष्य आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “आमच्याकडे २०२३ साली भारतात होणारा विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी आहे. आमच्या संघातील प्रमुख खेळाडूंचे आता सरासरी वय पाहता त्यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यानंतर कधी ना कधीतरी निवृत्ती घेणे सगळ्यांनाच क्रमप्राप्त आहे. कारण ४०-४१व्या वर्षापर्यंत तुम्ही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टिकून राहणे, अवघड आहे. मात्र कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास मी शक्य तितका काळ क्रिकेटच्या या सगळ्यात मोठ्या प्रकारांत खेळण्याचा प्रयत्न करेल.”
डेव्हिड वॉर्नर आता गुरुवारी दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यू साऊथ वेल्सच्या संघाकडून वनडे सामना खेळण्यासाठी उतरले. मार्श कप या स्थानिक स्पर्धेअंतर्गत हा सामना खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:
मॅक्सवेल फॉर्ममध्ये आला रे! एकाच षटकात चोपल्या २८ धावा अन् मोडली खुर्ची, टीकाकारांची बोलती बंद
फरशी पुसू की झाडू मारू? लग्नबेडीत अडकणाऱ्या बुमराहला माजी अष्टपैलूनं केलं ट्रोल
गोलंदाजाने टाकला असा घातक यॉर्कर की स्टंप्स चक्काचूर, एकदा व्हिडिओ पाहाच