---Advertisement---

गोलंदाजाने टाकला ‘असा’ घातक यॉर्कर की स्टंप्स चक्काचूर, एकदा व्हिडिओ पाहाच

On: बुधवार, मार्च 3, 2021 5:23 PM
---Advertisement---

कोरोनाच्या कठीण काळानंतर जगभरात क्रिकेट पुन्हा सुरू झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ टी-२० मालिका खेळत आहेत. तसेच झिम्म्बाबे आणि अफगाणिस्तान यांच्यात देखील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना अबू धाबीमधील शेख जायेद स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. तसेच या सामन्यात विक्टर नेयुचीने टाकलेला चेंडू सर्वत्र चर्चेचा विषय बनून आहे. या चेंडूची दखल आयसीसीने देखील घेतली आहे.

यॉर्कर चेंडू टाकने प्रत्येक गोलंदाजाला जमेलच असे नाही. खूप कमी गोलंदाज असतात ज्यांना ही कला अवगत असते. अशातच झिम्बाब्वे संघाकडून गोलंदाजी करतांना नेयुचीने अफगाणिस्तान संघाचा फलंदाज हश्मातुल्लाह शहीदी याला घातक यॉर्कर चेंडू टाकत त्रिफळा गुल करत माघारी पाठवले आहे. याचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

https://twitter.com/ICC/status/1366701722555412483?s=20

या सामन्यात झिम्बाब्वे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. झिम्बाब्वे संघाने गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अफगाणिस्तान संघाला ४७ षटकात १३१ धावावर सर्वबाद केले आहे. त्यानंतर फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने २५० धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला खास कामगिरी करता आली नाही. त्यांनी दुसऱ्या दिवसाखेर ७ बाद १११ केल्या आहेत.

पहिल्या डावात अफगाणिस्तान संघाचा डाव १३१ धावांवर आटोपल्यानंतर त्यांच्या नावावर नको असलेला विक्रम झाला आहे. अबू धाबी मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये या पहिल्या डावातील सर्वात कमी धावा (१३१) आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंड संघाच्या नावे होता. पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा डाव १५३ धावांवर आटोपला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

“अहमदाबादच्या खेळपट्टीवर जो रूट ५ बळी घेत असेल तर अश्विन-अक्षर यांचे कौतुक कशाला?”

फरशी पुसू की झाडू मारू? लग्नबेडीत अडकणाऱ्या बुमराहला माजी अष्टपैलूनं केलं ट्रोल

इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेआधी टीम इंडियाला टेंशन, चक्रवर्ती पाठोपाठ ‘हा’ खेळाडूही फिटनेस टेस्टमध्ये फेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---