---Advertisement---

वॉर्नरची चपळाई मयंक अगरवालला पडली महागात, झाला रनआऊट; पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 9, 2020 2:21 PM
---Advertisement---

गुरुवारी(८ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ६९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ बाद २०१ धावा केल्या होत्या आणि पंजाबला २०२ धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. आत्तापर्यंत यंदाच्या आयपीएल मोसमात या दोघांमध्ये चांगला समन्वय पहायला मिळाला होता. मात्र गुरुवारी झालेल्या सामन्यात दुहेरी धाव घेताना त्यांच्यात गोंधळ झालेला पाहायला मिळाला. ज्यामुळे मयंकला आपली विकेट गमवावी लागली.

झाले असे की पंजाबकडून हे दोघे फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात खलील अहमदच्या गोलंदाजीवर मयंकने कव्हरच्या दिशेने एक शॉट खेळला. यावर राहुल आणि मयंकने एक धाव पूर्ण केली. त्यानंतर लगेचच मयंक दुसरी धाव घेण्यासाठी धावला, पण त्याचवेळी राहुलेने दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला. पण तोपर्यंत मयंक बराच पुढे आला होता आणि राहुलही थोडा पुढे आला होता. पण राहुने दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिल्याने मयंक मागे फिरला.

या गोंधळादरम्यान वॉर्नरने चपळाईने चेंडू पकडत नॉन-स्ट्रायकर एन्ड्सच्या दिशेने फेकलाही होता आणि तिथे असलेल्या अहमदने चेंडू झेलत मयंक क्रिजमध्ये पोहचायच्या आत स्टंप्सवरील बेल्स उडवल्या. त्यामुळे मयंक धावबाद झाला. यानंतर मयंक राहुलवर नाराज झालेला दिसला.

यानंतर काहीवेळातच राहुलही ११ धावा करुन बाद झाला. पुढे निकोलस पूरनने तुफानी खेळी करत पंजाबला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्याला अन्य फलंदाजांनी पुरेशी साथ दिली नाही. त्यामुळे पंजाबला १६.५ षटकात सर्वबाद १३२ धावाच करता आल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मुर्ती लहान पण किर्ती महान! गावसकरांना कमी उंचीमुळे ट्रोल करणाऱ्यांना ‘या’ खेळाडूने दिले सडेतोड उत्तर

‘…म्हणूनच तो दिग्गज खेळाडू आहे,’ बेयरस्टोने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक

हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही पंजाबच्या ‘या’ फलंदाजाचीच होतेयं सर्वत्र चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---