आयपीएलच्या 56 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स संघावर 10 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर हैदराबाद संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले असून त्यांचा पुढील सामना शुक्रवारी (६ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी वॉर्नरने बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला चॅलेंज केले आहे.
आयपीएल च्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेला मुंबईचा संघ या हंगामातील सर्वात बलाढ्य संघ मानला जातोय. अशा बलाढ्य संघाला मोठ्या फरकाने हरवून ‘प्ले ऑफ’ मध्ये जागा बनविणे हैद्राबाद संघाला शक्य झाले. या विजयानंतर वॉर्नरचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. वॉर्नरने सामन्याच्या शेवटी याबाबत आपले म्हणणे मांडले.
“पंजाब विरुद्ध पराभूत झाल्यानंतर पुनरागमन करणे कठीण वाटत होते. परंतु मुंबईने काही खेळाडूंना विश्रांती दिली होती. त्यातच त्यांना 150 धावांपर्यंत थांबविण्यातही आम्हाला यश आले. याचे सर्व श्रेय गोलंदाजांना जाते. नदीमने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. आमचा संघ दुखापतीमुळे ग्रासला होता. तसेच, संघातील व पडद्यामागील लोकांनीही उत्तमपणे साथ दिली. यामुळेच आम्ही यशस्वी ठरलोय,” असे तो म्हणाला.
‘एलिमिनेटर’ सामन्याबाबत वोर्नरचे वक्तव्य
एविमिनेटर सामन्यात बेंगलोरबाबत डेविड वॉर्नरने वक्तव्य केले आहे. तो म्हणाला, “सुदैवाने मागील काही सामने आमच्यासाठी चांगले होते. आणि आम्ही देखील सकारात्मकपणे पुढे जात आहोत. बेंगलोर या हंगामातील एक चांगला संघ बनला आहे. ज्याचे नेतृत्त्व विराट कोहली चोखपणे करीत आहे. परंतु बेंगलोरला आम्ही 2016 च्या फायनल मध्येही हरवले होते. आणि मी आताही ‘करो वा मरो’च्या सामन्यात आव्हानासाठी उत्सुक आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात बदल, रोहितला मिळणार संधी?
-नाडाने घेतले केएल राहुल- रवींद्र जडेजाचे नमुने; जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
-हैदराबादची प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री; ‘या’ ३ कारणांमुळे मुंबईचा दारुण पराभव
-वनडेत १७४ चेंडूत नाबाद ३६ धावा करणाऱ्या गावसकरांनी एकदा सेहवाग स्टाईल केली होती गोलंदाजांची धुलाई
-आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…