मुंबई। ब्रेबॉर्न स्टेडियमवर बुधवारी (१९ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून मोठा विजय नोंदवला. या विजयात दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने मोठे योगदान दिले. त्याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
या सामन्यात (DC vs PBKS) पंजाबने दिल्लीसमोर ११६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ यांनी ८३ धावांची भागीदारी केली आणि विजयाचा पाया रचला. शॉ ४१ धावा करून बाद झाला. पण नंतर वॉर्नरने सर्फराज खानच्या साथीने दिल्लीला १०.३ षटकातच विजयापर्यंत पोहचवले.
वॉर्नरने या सामन्यात ३० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला. वॉर्नरचे हे आयपीएलमधील ५३ वे अर्धशतक होते. तसेच वॉर्नरने यापूर्वी ४ शतकेही आयपीएलमध्ये ठोकली आहेत. त्यामुळे वॉर्नरने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ५७ वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. हा एक विक्रम असून आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर अव्वल क्रमांकावर आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) वॉर्नरपेक्षा खूप दूर आहेत. या दोघांनीही आयपीएलमध्ये प्रत्येकी ४७ वेळा ५० धावांचा टप्पा गाठला आहे (Most 50+ scores by batters in IPL).
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणारे क्रिकेटपटू
५७ वेळा – डेव्हिड वॉर्नर (५३ अर्धशतके, ४ शतके)
४७ वेळा – शिखर धवन (४५ अर्धशतके, २ शतके)
४७ वेळा – विराट कोहली (४२ अर्धशतके, ५ शतके)
४३ वेळा – एबी डिविलियर्स (४० अर्धशतके, ३ शतके)
४१ वेळा – रोहित शर्मा (४० अर्धशतके, १ शतके)
धावांचा पाठलाग करतानाही वॉर्नरच अव्वल
याशिवाय आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना वॉर्नरने बुधवारी २९ व्यांदा ५० धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना देखील सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम वॉर्नरच्याच नावावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून त्याने २१ वेळा अशी कामगिरी केली आहे (Most 50+ Scores in IPL Chases).
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिकवेळ ५०+ धावा करणारे क्रिकेटपटू
२९ वेळा – डेव्हिड वॉर्नर
२१ वेळा – शिखर धवन
२० वेळा – गौतम गंभीर
१८ वेळा – विराट कोहली
१८ वेळा – केएल राहुल
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरने पंजाबविरुद्ध केली झंझावाती फिफ्टी, पण तरीही मुली होतील नाखुश; जोस बटलर आहे मोठे कारण
‘झुकेगा नहीं…’, दिल्लीच्या धमाकेदार विजयानंतर वॉर्नरसह पंतचे ‘पुष्पा’ स्टाईल सेलिब्रेशन