ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वाॅर्नर आज इंस्टाग्रामवर टक्कल करतानाचा व्हिडीओ शेअर केला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जे कर्मचारी काम करत आहे त्यांना पाठींबा देण्यासाठी त्याने टक्कल केले आहे.
यात टाईम लॅप व्हिडीओचा वापर करत टक्कल करतानाचा व्हीडिओ वाॅर्नरने शेअर केला आहे. यात त्याने एक व्हिडीओ व फोटोही शेअर केला.
या व्हीडिओच्या माध्यमातून वाॅर्नरने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, संघसहकारी स्टिवन स्मिथ, पॅट कमिन्स व अष्टपैलू खेळाडू मार्क्स स्टाॅईनिस यांनाही टक्कल करण्यासाठी नाॅमिनेट केले आहे. David Warner shaves head to show support for medical staff fighting against COVID-19.
https://www.instagram.com/p/B-YVHGwJIqU/
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. या व्हायरसला नष्ट करण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. क्रीडाजगत एकप्रकारे ठप्प झाले आहे. त्यामुळे खेळाडू आपल्या परिवारासोबत घरातच वेळ घालवत आहेत. अनेक क्रिकेटपटू सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आहेत. तसेच आपल्या फीटनेसचीही काळजी घेत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अनेक शारिरिक कमी होत्या, तरीही हे ५ खेळाडू ठरले सर्वश्रेष्ठ
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ५ खेळाडू
-क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारे ५ फलंदाज