---Advertisement---

व्हिडिओ: डेविड वॉर्नरने पत्नीसह केला भन्नाट डान्स, सहकारी खेळाडूने केली मजेदार कमेंट

On: सोमवार, जून 28, 2021 11:42 PM
---Advertisement---

आजकालचे युग हे सोशल मिडियाचे युग आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट आजकाल सोशल मिडियावर शेअर केली जाते. कुठे फिरायला  गेले,आज काय खाल्ले आज कोणाचा वाढदिवस आणि अश्या बऱ्याच गोष्टी .या सगळ्या गोष्टीत क्रिकेटरसुद्धा मागे नसतात. आजकाल क्रिकेटर सोशल मिडियाचा वापर जास्त करतात. सर्वात जास्त सोशल मिडियाचा वापर करणारा खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाचा डेविड वॉर्नर आहे. वॉर्नर नेहमीच आपल्या पत्नीसह काही न काही व्हिडिओ बनवत असतो. हल्लीच त्याने एक व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर शेअर केला. या व्हिडिओवर त्याच्याच संघातील खेळाडूने एक मजेशीर भाष्य केले आहे.

वॉर्नर खूपवेळा प्रेक्षकांच्या संपर्कात येत असतो. कधी तो सोशल मिडियावरून गप्पा गोष्टी करतो तर, कधी भारतीय गाण्यांवर डान्स करतो. वॉर्नरने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवरून आपल्या पत्नी सोबत डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा मुलींनीसुद्धा शेवटच्या क्षणी आश्चर्यचकित केले. हा व्हिडीओ भारतीय लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध झाला आहे.

वॉर्नरने व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिले की, ‘कोणी सर्वात चांगला डान्स केला आहे? आणि येत्या कालावधीत आम्ही अजून डान्सचे व्हिडिओ शेअर करणार आहोत. म्हणून मी तुमचे मत घेतो आहे. तुम्ही मला अजून माहिती द्या ज्यामुळे मी अजून व्हिडिओ बनवू शकतो.’ वॉर्नरच्या या प्रश्नांवर त्याचाच पत्नीने म्हणजे कॅन्डी वॉर्नरने भाष्य केले की, ‘मी सर्वात चांगला डान्स केला आहे.’

https://www.instagram.com/p/CQk5Fvfl_oB/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

वॉर्नरने शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याचाच संघातील फलंदाज उस्मान ख्वाजाने मजेशीर भाष्य केले. ख्वाजा लिहतो की, ‘तुम्ही गाण्याच्या आवाजासह नाचत नव्हता.’ त्यावर वॉर्नर प्रतिउत्तर देताना म्हणाला की, ‘कम ओन ब्रदर.’ वॉर्नरने भारतीय चाहत्यांकडून केलेल्या भाष्यावर सुद्धा प्रतिउत्तर दिले आहे. आणि भारतीय लोकांबद्दलचे प्रेम दर्शवले आहे.

दरम्यान, येत्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून वॉर्नरने कोविड-१९ मुळे माघार घेतली आहे. जैवसुरक्षित वातावरण आणि विलगीकरणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा मैदानावर खेळतांना पाहण्यासाठी चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

“तुझा बाप ही करेल हे काम”, माजी प्रशिक्षक युनिस खानने या वेगवान गोलंदाजाला केली होती शिवीगाळ

वाद पेटला! बालेवाडी स्टेडियममधील रेस ट्रॅकवर शरद पवारांसह बड्या नेत्यांच्या गाड्या पार्क, केंद्रीय क्रीडामंत्र्यांची नाराजी

शेफाली वर्मा १७ नव्हे तर २८ वर्षांची? जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---