---Advertisement---

“तुझा बाप ही करेल हे काम”, माजी प्रशिक्षक युनिस खानने या वेगवान गोलंदाजाला केली होती शिवीगाळ

On: सोमवार, जून 28, 2021 1:36 PM
---Advertisement---

येत्या ८ जुलै पासून पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे.या मालिकेपूर्वी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच यूनिस खान यांनी पाकिस्तानी संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडण्याचा मोठा निर्णय घेतला होता. परंतु, यामागचे खरे कारण आता समोर आले आहे.

पाकिस्तान क्रिकट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कथित दुर्व्यवहारानंतर यूनिस खान यांनी पाकिस्तान संघाचे फलंदाजी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता धक्कादायक बाब समोर येत आहे की, यूनिस खान आणि पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली यांच्यात वादविवाद झाला होता.(Younis Khan did a bad behaviour with Hasan Ali said verbal abbuse)

एका विश्वसनीय सूत्राने पीटीआयला सांगितले की,” यूनिस खान खानला काही दिवसांनंतर बायो बबलमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु, बोर्डासोबत चर्चा झाल्यानंतर यूनिस खान यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.

का सोडले यूनिस खान यांनी पद?
सूत्राने पुढे म्हटले की,”खरे कारण असे आहे की, यूनिस खानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला विनंती केली होती की, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांना बायो बबलमध्ये नंतर जोडण्याची परवानगी देण्यात यावी कारण, त्यांना त्यांच्या दाताचा उपचार करायचा होता.”

तसेच सूत्राने पुढे म्हटले की,”यूनिस खान इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी, हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये अनुकूलन शिबिरात सहभागी होण्यासाठी तीन दिवसासाठी लाहोरमध्ये आले होते. परंतु, त्यानंतर घोषणा करण्यात आली की,सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांना इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विलगिकरणात रहावे लागणार आहे. परंतु, यूनिस खानने पीसीबीला आग्रह केला होता की, त्यांना दातावर उपचार करण्यासाठी कराचीला जाण्यासाठी आणि उशिरा संघासोबत जोडण्याची परवानगी देण्यात यावी.”

हसन अली सोबत केली होती गैरवर्तणूक
आता आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, युनिस खानने पाकिस्तान वेगवान गोलंदाज हसन अली सोबत गैरवर्तणूक केली होती. ही गोष्ट तेव्हा घडली होती,जेव्हा हसन अलीने आइस बाथ घेण्यास नकार दिला होता. त्यावेळी युनिस खानने संतापात येऊन शिवीगाळ केली होती. पाकिस्तानी पत्रकार साज सादिकने केलेल्या एका ट्विटनुसार युनिसने म्हटले होते की,”तुझा बाप पण आइस बाथ घेईल.”

https://twitter.com/Saj_PakPassion/status/1408848814413422596?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1408848814413422596%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fcricket%2Fyounis-khans-did-a-bad-behaviour-with-hasan-ali-said-verbal-abuse-to-him%2F929615

जुलैमध्ये पाकिस्तान संघाचा इंग्लड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटच्या बाबतीत श्रीलंकेचा दौरा अगदी सोपा; पाहा ‘ही’ आकडेवारी

भारीच! युवराज खेळू शकतो ऑस्ट्रेलियातील ‘या’ क्लबकडून; डिविलियर्स, लारासारख्या खेळाडूच्या सहभागाची शक्यता

“श्रीलंका दौऱ्यावर सर्व खेळाडूंना संधी देणे शक्य नाही”, द्रविडचे मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---