ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या चौथ्या दिवशी (29 डिसेंबर)एक डाव आणि 182 धावांची मोठा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा शिल्पकार अनुभवी सलामीवीर डेव्हड वॉर्नर हा ठरला. काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या वॉर्नरने या कसोटीत शानदार द्विशतक झळकावले. हा सामना संपल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांशी दिलेली एक प्रतिक्रिया आता चांगला चर्चेचा विषय होत आहे.
डेव्हिड वॉर्नर हा मागील जवळपास दीड वर्षापासून खराब फॉर्ममध्ये होता. या मालिकेतील पहिल्या कसोटीतही तो दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे त्याला संघातून वगळण्याची मागणी होत होती. काहींनी तर थेट त्याला निवृत्तीचा सल्लाही दिलेला. त्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी त्याचा वाद झाल्याने या मालिकेत अशीच सुमार कामगिरी राहिल्यास त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती.
परंतु, वॉर्नरने या सर्व चर्चा बंद करणारी एक अप्रतिम खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना खेळत असलेल्या वॉर्नरने 200 धावांची खेळी केली. या खेळीनंतर बोलताना त्याने एक प्रतिक्रिया दिली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्याला निवृत्तीविषयी विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मी पुढील वर्षी होत असलेली जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे विश्वचषक खेळण्याचा विचार करत आहे. स्वतःची तंदुरुस्ती ठेवण्याचा आणि चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मात्र, संघ व्यवस्थापन मला येऊन तू निवृत्त हो असे म्हणाल्यास मी नाही म्हणणार नाही.”
काही दिवसांपूर्वीच वॉर्नर याने सोशल मीडिया पोस्ट करत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्याला पाठिंबा दिला नसल्याचे म्हटले होते.
(David Warner Talks On His Retirement Plan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची जबाबदारी
क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण






