गेले काही वर्ष भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. घरगुती खेळपट्टीवर आणि विदेशी खेळपट्टीवर भारतीय संघ सातत्याने सामने जिंकतो आहे. हा सगळा बदल काही एका रात्रीत झालेला नाही. तर, यासाठी भारतीय प्रशिक्षकांनी, मार्गदर्शकांनी अनुभवी खेळाडूंसह अनेक प्रतिभाशाली युवा खेळाडूंलाही घडवले आहे. यामुळे कोणत्याही वेळी भारतीय संघ एका वेळेस दोन संघ तयार करुन मैदानावर उतरु शकतो. यामागे एक माणूस भिंतीसारखा उभा राहिला, तो म्हणजे राहुल द्रविड.
द्रविडने पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मयंक अग्रवाल आणि अजून खूप खेळाडूंना निरखून त्यांना चांगला खेळाडू म्हणून घडवले. अगदी ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने सुद्धा हि गोष्ट मान्य केली आहे. द्रविडमुळे आज भारत एकावेळी दोन संघ घेऊन खेळू शकत असल्याचा विश्वास त्याला आहे.
डेविड वॉर्नर स्पोर्ट्स अपडेट टूडेसोबत बोलताना म्हणाला की, “आज भारतीय संघ जसा दिसतो आहे, त्यामागे पूर्णपणे हातभार राहुल द्रविडचा आहे. त्याने एकाहून एक दमदार मॅच विनर खेळाडू घडवले आहेत. त्यामुळे भारतीय संघात इतका बदल झाला आहे. ही गोष्ट समजण्यासाठी जास्त लांब जायची गरज नाही. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताचे विराट कोहली, इशांत शर्मा, मोहम्मद शमीसारखे वरिष्ठ खेळाडू नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला हरविले.”
गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ नवख्या खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि उमेश यादव दोन कसोटी सामने खेळले नव्हते. तसेच आर अश्विन आणि हनुमा विहारी प्रत्येकी १ सामना खेळले नव्हते. शेवटचा सामना सुरु होण्यापूर्वी फक्त प्लेईंग ११ मध्ये २ खेळाडू शिल्लक राहिले होते. त्यामुळे मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी और शुभमन गिल या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली.
द्रविडने १५० युवा खेळाडू घडवले
द्रविड़ आणि महाम्ब्रे यांनी मिळून १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील जवळपास १५० खेळाडूंना तयार करायचे ठरवले. १५० खेळाडूंना प्रत्येकी २५/२५ च्या सहा गटात विभागले गेले आणि प्रत्येक गटाला ‘झोनल क्रिकेट’मध्ये १ महिन्याच्या कॅम्पसाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यातून पहिले ५० खेळाडू निवडण्यात आले आणि त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. या प्रशिक्षणात फिजियो, ट्रेनर आणि मार्गदर्शक हे आंतरराष्ट्रीय स्तराचे होते.
द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताने जिंकला १९ वर्षा खालील विश्वचषक
राहुल द्रविडने २०१५ पासून १९ वर्षांखालील खेळाडूंच्या मुख्य प्रशिक्षकापदाचा कार्यभार सांभाळला. त्याच्या परिणामी २०१६च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघ उप-विजेता ठरला. परंतु, २०१८ साली भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आला नाही. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनातच पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, मयंक अग्रवाल, ईशान किशन आणि अजून बरेच खेळाडू तयार झाले.
आईपीएलचा मागर्दर्शकसुद्धा राहिला आहे राहुल द्रविड
१९ वर्षांखालील खेळाडूंचा प्रशिक्षक होण्याअगोदर २०१२-१३ साली राजथान रॉयल्स संघासाठी प्रशिक्षक, कर्णधार आणि मार्गदर्शकसुद्धा राहिला आहे. द्रविडच्या प्रशिक्षणात राजस्थान संघाने २०१३ मध्ये प्ले-ऑफ पर्यंत मजल मारली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!
अश्विनला सर्वकालिन सर्वोत्तम न म्हणणाऱ्या मांजरेकरांचा बड्या खेळाडूकडून बचाव, म्हणाले…
‘अश्विन नव्हे स्वत:च्या बळावर शिकलो कॅरम बॉल गोलंदाजी,’ नवनियुक्त शिलेदाराची प्रतिक्रिया