---Advertisement---

ऍशेसनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू होणार निवृत्त? ‘ती’ सोशलमीडिया पोस्ट चर्चेत

On: मंगळवार, जुलै 11, 2023 9:58 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान प्रतिष्ठेची ऍशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले तीन सामने खेळले गेले असून ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी आघाडी घेतलीये. या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. मागील काही काळापासून त्याच्यावर कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीचा दबाव आहे. अशा स्थितीत आता त्याच्या पत्नीने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे तो लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CufEprmMDnb/?igshid=MzRlODBiNWFlZA==

ऍशेस मालिकेत वॉर्नर आतापर्यंत फारसा यशस्वी ठरला नाही. मालिकेत त्याच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक आले असून, हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत तो दोन्ही डावात दुहेरी आकडा गाठू शकला नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात तो चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरलेला. मात्र, त्या आधी झालेल्या भारत दौऱ्यावर देखील पहिल्या दोन कसोटी तो पूर्णतः अपयशी ठरला होता. त्यानंतर दुखापतग्रस्त होऊन मायदेशी परतल्यानंतर त्याच्यावर कसोटीतून निवृत्त होण्यास दबाव वाढलेला.

या सर्व पार्श्वभूमीवर त्याची पत्नी कँडीस हिने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यामध्ये तिने लिहिले,

‘कसोटी संघासोबत प्रवास आता पूर्ण झाला आहे. हा प्रवास शानदार होता. तुझी सर्वात मोठी समर्थक आणि गर्ल गॅंग. लव यू डेव्हिड वॉर्नर’

तिच्या या पोस्टवरून अंदाज लावला जात आहे की वॉर्नर आपला अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. असे असले तरी वॉर्नर याने काही दिवसांपूर्वीच आपल्या निवृत्तीबाबत बोलताना म्हटले होते की, मी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात सिडनी येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीनंतर कसोटीतून निवृत्त होऊ शकतो. आता त्याला संघ व्यवस्थापन आणखी संधी देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

(David Warner Wife Candice Cryptic Post Fans Said Warner Retired From Test)

महत्वाच्या बातम्या-
नाईट रायडर्सचे नेतृत्व नरीनच्या हाती! अमेरिकेत उडणार टी20 क्रिकेटचा धुरळा, ‘हे’ दिग्गज ही साथीला
पाकिस्तानला नडणार अतिशहाणपणा! ‘या’ संघाला वर्ल्डकपमध्ये प्रवेश देण्याची आयसीसीची तयारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---