---Advertisement---

एका चुकीची शिक्षा आयुष्यभरासाठी? ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात वॉर्नरच्या पत्नीने उठवला आवाज

On: बुधवार, जुलै 6, 2022 6:29 PM
David-Warner-Candice-Warner
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर २०१८ साली चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी अडचणीत आला होता. याच पाश्वभूमीवर वॉर्नर आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षाची बंदी घातली होती. तसेच वॉर्नरला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कर्णधारपद भूषवता येणार नाही, असाही निर्णय बोर्डाने घेतला होता. आता वॉर्नरची पत्नी कँडिस वॉर्नर हिने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे.

दरम्यान, २०१८ साली चेंडूशी छेडछाड प्रकरणात डेविड वॉर्नर (David Warner), माजी कर्णधार स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट या तिघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाई केली होती. या तिघांवर वादानंतर एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली गेली होती. स्मिथला दोन वर्ष कर्णधारपदापासून लांब ठेवले गेले होते. तर वॉर्नरला त्याच्या उर्वरित कारकिर्दीत संघाचे नेतृत्व करता येणार नाही, असा निर्णय बोर्डाने घेतला होता.

याच पार्श्वभूमीवर कँडिस वॉर्नर (Candice Warner) हिने सोमवारी (४ जुलै) नाराजी व्यक्त केली. कँडिसच्या मते तिच्या पतीवर कर्णधारपदासाठी लावली गेलेली बंदी लवकरात लवकर उठवली पाहिजे. वॉर्नरच्या पत्नीच्या मते तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये त्याला कर्णधारपद मिळते, पण ऑस्ट्रेलियामध्ये तो ही जबाबदारी पार पाडू शकत नाहीये.

कँडिसच्या हवाल्याने एका वृत्तात सांगितले गेले की, “मला अन्याय आवडत नाही, त्यामुळेच मला त्रास होतो. तो संयुक्त अरब अमीरातमध्ये खेळेल्या गेलेल्या विश्वचषकात (टी-२०) कर्णधाराची भूमिका पार पाडू शकत होता. तो भारतात कर्णधार बनू शकतो, जिथे लोकं त्याच्या क्रिकेटचे कौतुक करतात. परंतु ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करू शकत नाही, असे का?” कँडिसने पुढे असेही सांगितले की, वॉर्नरकडे जगभरातील टी-२० लीगमध्ये कर्णधारपद भूषवण्यासाठीचे अनेक प्रस्ताव आहेत.

दरम्यान, मागच्या वर्षी यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियन संघाने त्यांचा पहिला टी-२० विश्वचषक जिंकला आणि यामध्ये वॉर्नरची भूमिका महत्वाची राहिली होती. ऑस्ट्रेलियाने नुकताच श्रीलंका दौरा केला. श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही वॉर्नरचे प्रदर्शन महत्वपूर्ण राहिले होते.

बिग बॅश लीगमधील सिडनी सिक्सर्स संघाचे प्रशिक्षक ग्रेग शिपर्डनेही यापूर्वी वॉर्नरवरील नेतृत्वाची बंदी उठवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागणी केली होती. ग्रेगच्या मते वॉर्नरने त्याच्यावरील एक वर्षाची बंदी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि त्यामुळे त्याला बोर्डाकडून काही प्रमाणात सूट मिळणे अपेक्षित आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदी रोहित नव्हे ‘हा’ खेळाडू

हे नक्की काय आहे? ‘बझबॉल’बद्दलच्या प्रश्नावर भारतीय प्रशिक्षक द्रविड यांचे लक्षवेधी उत्तर

भारतीय दिग्गजांनी गायले इंग्लंडचे कौतुक, टीम इंडियाला म्हटले ‘या’ चुका सुधारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---