---Advertisement---

बाबा नंबर १! वीकेंडला वॉर्नर असा करतो लाडक्या लेकींबरोबर मजा; पाहा बाप-लेकींचे गोड व्हिडिओ

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कॅंडिस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. ते अनेकदा मजेदार व्हि़डिओ शेअर करत असतात. असाच एक व्हिडिओ कँडिसने शेअर केला आहे, ज्यात वॉर्नर त्याच्या मुलींचे लाड करत आहे. वॉर्नरला तीन मुली आहेत.

वॉर्नर सध्या आयपीएल २०२१ हंगाम २९ सामन्यांनंतर स्थिगत झाला असल्याने मायदेशी परतला आहे, मात्र, तो सध्या १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत असल्याने घरी गेलेला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबिय त्याची आठवण काढत आहेत. याच निमित्ताने कँडिसने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की वॉर्नर त्याच्या मुलींसाठी खाण्याचे पदार्थ बनवत आहे. तसेच तो त्याच्या सर्वात लहान मुलीसोबत एक खेळ खेळत आहे. या बाप-लेकींच्या गोड व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कँडिसने लिहिले आहे की ‘विकेंडसाठी तुमची काय योजना आहे? वॉर्नर हाऊसमध्ये जेव्हा सुपर डॅड डेव्हिड वॉर्नर घरी असतो, तेव्हा आमची सकाळ किंवा दुपार साधारण अशी असते. आमच्यासाठी आठवड्याची अखेर ही केवळ मुलींसाठी असते. असे क्षणांची सध्या आम्हाला आठवण होत आहे. पण डॅडी घरी आल्यानंतर येणाऱ्या आठवड्यांसाठी आम्ही उत्साहीत आहोत.’

https://www.instagram.com/p/CPJlBcShf2G/

वॉर्नरनेही या व्हिडिओला प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की ‘आता मी तुमच्या सर्वांना बघण्याची वाट पाहू शकत नाही.’

Screengrab: Instagram/Mrs Candice Warner

वॉर्नरचा लेकींवर आहे प्रचंड जीव
वॉर्नर त्याच्या मुलींवर खूप प्रेम करतो, हे अनेकदा त्याच्या पोस्टवरुन दिसून येते. तो अनेकदा त्याच्या मुलींबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२१ स्थगित होण्याच्या दरम्यान वॉर्नरच्या मुलीने त्याच्यासाठी एक छोटेसे पत्र लिहिले होते. यामध्ये तिने लिहिले होते, ”प्लीज डॅडी थेट घरी या. आम्हा सर्वांना तुमची फार आठवण येत आहे आणि आम्ही सर्व तुमच्यावर फार प्रेम करतो. इवी, इंडी आणि आयलाकडून तुम्हाला खूप सारं प्रेम.”

तसेच आयपीएल दरम्यान, वॉर्नरने त्याच्या शुजवर त्याच्या तिन्ही मुलींची आणि पत्नीचे नाव लिहिले होते.

आयपीएल २०२१ मध्ये वॉर्रनची विसरण्यासारखी कामगिरी
वॉर्नरच्या कामगिरीचा विचार केला असता त्याच्यासाठी आयपीएल २०२१ स्पर्धा विसरण्यासारखी ठरली. आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या वॉर्नरला ६ सामन्यांनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आणि नेतृत्त्वपदाचा मुकुट केन विलियम्सनच्या डोक्यावर चढवण्यात आला.

आयपीएल २०२१ हंगामात हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वाखाली ६ सामने खेळले. त्यातील केवळ १ सामना जिंकण्यात संघाला यश आले. तर ५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्यानंतर विलियम्सनने नेतृत्व केलेल्या एका सामन्यात देखील हैदराबादला पराभवाचाच सामना करावा लागला. वॉर्नरने या हंगामात ६ सामन्यांत १९३ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

क्या बात है! फलंदाजीत १५ षटकार, गोलंदाजीत लॅब्यूशेनची विकेट; ‘त्या’ ४५ वर्षीय क्रिकेटरचे आर अश्विनकडूनही कौतुक

एवढा कॉन्फिडन्स! इंग्लिश दिग्गजाची भविष्यवाणी, भारत-इंग्लंडमध्ये ‘हा’ संघ ५-०ने जिंकेल कसोटी मालिका

‘विराटसेना’साठी इंग्लंडकडून खुशखबर! क्वारंटाईन कालावधीत घट, सरावासही मिळणार जास्तीचा वेळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---