मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया पुरूष क्रिकेट संघात कर्णधारपदावरून अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. नुकतेच ऍरॉन फिंच याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. त्यामुळे कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार आहे. त्यातच मोठी माहिती समोर येत आहे. डेविड वॉर्नर हा पण आता नेतृत्व करताना दिसणार आहे, मात्र त्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया डावखुरा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याला कर्णधार बनवण्याच्या निर्णयावर विचार करणार असल्याचे काही रिपोर्ट्स पुढे येत आहेत. कारण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेत (कोड ऑफ कंडक्ट) सुधारणा केल्यानंतर वॉर्नर आता त्याच्यावर आजीवन नेतृत्व बंदी उठवण्यासाठी अर्ज करू शकतो. ज्यामुळे वॉर्नरसाठी कर्णधारपदाचे दरवाजे पुन्हा खुले झाले आहेत.
केपटाऊनमध्ये 2018 ला झालेल्या बॉल टेम्परिंग अर्थातच चेंडूशी छेडछाड केलेल्या प्रकरणामुळे वॉर्नरवर नेतृत्व करण्याची कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली होती. तसेच तो त्याबाबत काही करूही शकत नव्हता. वॉर्नरचे म्हणणे तीन आयुक्त असलेल्या आचार संहिता समीक्षाच्या पॅनलने ऐकण्याचे ठरवले. ज्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचा निर्णय सांगितला गेला.
सिडनी थंडरने क्रिकेट न्यू साउथ वेल्सला मागणी केली की वॉर्नरच्या नेतृत्वावर योग्य तो निर्णय घ्यावा. जेणेकरून तो जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बीग बॅश लीगमध्ये संघाचे नेतृत्व करेल. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डने ऑक्टोबरमध्येच आचार संहितेत बदल केला होता. यामुळे वॉर्नर लवकरच कर्णधाराच्या भुमिकेत दिसणार आहे. David Warner will soon be seen leading Australia! The board created the way
चेंडूशी छेडछाड केल्यामुळे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि वॉर्नर यांना एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळण्याची शिक्षा दिली होती. तसेच कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यालाही 9 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा दंड ठोठावला होता. जेव्हा ते प्रकरण झाले तेव्हा स्मिथ कर्णधार होता, त्यामुळे त्याला दोन वर्ष तर वॉर्नरवर कायमचे नेतृत्व न करण्याची बंदी लादली होती. तेव्हा वॉर्नर उपकर्णधार होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 3 वेळेस फायनलचे तिकीट मिळवणारे कर्णधार, एकमेव भारतीयाचा समावेश
मोठी बातमी! भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याला केन विल्यमसन मुकणार, नेतृत्वपद ‘या’ खेळाडूकडे