ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) असून उभय संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले २ सामने अनिर्णीत राहिले आहेत. त्यातही नुकसाच संपलेला कराची कसोटी सामना (Karachi Test) अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यादरम्यान कराचीच्या खेळपट्टीवर (Karachi Pitch) प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हातोडा घेऊन खेळपट्टी नीट करताना दिसले.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा असे करतानाचा व्हिडिओ पुढे आला होता. यानंतर आता डेविड वॉर्नर (David Warner) हातोड्यासह खेळपट्टीवर (Warner Thor Hammer On Karachi Pitch) मेहनत घेताना दिसला आहे. त्याला असे काम करताना पाहून त्याच्या पत्नीने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
कराची कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानचा संघ त्यांच्या दुसऱ्या डावात ४ बाद ३८० धावांवर खेळत असताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर हातात हातोडा घेऊन खेळपट्टीवर मारताना दिसला. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम १९१ धावा आणि मोहम्मद रिझवान ६० धावांवर खेळत होता. वॉर्नरने जवळपास ४३ सेंकद खेळपट्टीवर हातोड्याने मेहनत घेतली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
The Thor hammer made another cameo today. #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/6LpKTUo554
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 16, 2022
आपल्या पतीला असे काम करताना पाहून कँडिस वॉर्नर (Candice Warner) चकित झाली आहे. तिने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा व्हिडिओ रिट्वीट करत गमतीशीर शब्दांमध्ये लिहिले आहे की, ‘अपेक्षा करते की, तू घराभोवतीही अशीच मेहनत घेशील.‘ पुढे तिने हसण्याचे इमोजीही जोडले आहेत.
I wish @davidwarner31 would do this a little bit more around the house!! 🤣🤣 https://t.co/hFhdFGqPTA
— Candice Warner (@CandiceWarner31) March 17, 2022
वॉर्नरच्या मेहनतीनंतर ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी विकेट
वॉर्नरच्या मेहनतीनंतर लगेचच ऑस्ट्रेलिया संघाला मोठी विकेटही मिळाली. त्याने हातोड्याने खेळपट्टीवर मेहनत घेतल्यानंतर थोड्याच वेळात द्विशतक पूर्ण करण्याच्या नजीक असलेला पाकिस्तानचा कर्णधार आझम बाद झाला. त्याने १९६ धावांवर त्याची विकेट गमावली. आझमपाठोपाठ फहीम अश्रिफ आणि साजिद खान यांनीही लवकरच विकेट्स गमावल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! शारापोव्हा आणि शुमाकर यांच्यावर गुडगाव पोलिसांकडून फसवणूकीचा गुन्हा दाखल, प्रकरण गंभीर
बांगलादेश दौरा की आयपीएल २०२२? दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटर्सची जाणून घ्या पहिली पसंती
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात चारली धूळ