---Advertisement---

Video – भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेदरम्यान डेविड वॉर्नरचे साऊथ इंडियन गाण्यावर थिरकले पाय

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 10:01 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर मध्यंतरी त्याच्या अनेक डान्स व्हिडिओमुळे चर्चेत होता. त्याने त्याचे अनेक टीक-टॉक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. यातील अनेक व्हिडिओ तेलुगू गाण्यांवर डान्स करतानाचे होते. त्यातीलच त्याचा ‘बुट्टबम्मा’ या तेलुगु गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ बराच चर्चेत आला होता आणि व्हायरसही झाला होता. याच गाण्यावरील काही स्टेप्स वॉर्नर शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) भारताविरुद्ध सिडनी येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यानही करताना दिसला.

झाले असे की या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी बाऊंड्री लाईनजवळ वॉर्नरला क्षेत्ररक्षण करताना पाहुन ‘वॉर्नर, बुट्टबम्मा’ असे ओरडायला सुरुवात केली.

यावर वॉर्नरनेही त्यांना प्रतिसाद देत तिथेच या गाण्यावरील काही स्टेप्स केल्या. वॉर्रनचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सनरायझर्स हैदराबादनेही त्याचा हा व्हिडिओ रिट्विट केला आहे.

वॉर्नरने मेमध्ये केला होता या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर –

वार्नरने मे महिन्यात त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नरसोबत मिळून ‘बुट्टबम्मा’ या तेलुगु गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. विशेष म्हणजे, त्याने हा डान्स सनराइजर्स हैद्राबाद संघाची जर्सी घालून केला होता.

https://www.instagram.com/p/CH1pQbNFYgQ/

शुक्रवारी भारताचा झाला पराभव –

शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६६ धावांनी पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३७४ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांच्याकडून कर्णधार ऍरॉन फिंच(११४) आणि स्टिव्ह स्मिथने(१०५) शतकं केले. तर वॉर्नरने ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली.

प्रतिउत्तरादाखल भारताला ५० षटकात ३०८ धावाच करता आल्या. भारताकडून हार्दिक पंड्या(९०) आणि शिखर धवन(७४) यांनी अर्धशतके झळकावली. पण त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला खास काही करता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही क्रिकेट मालिकेत होईल पराभव, माजी कर्णधाराची भविष्यवाणी

‘असा’ कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---