भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिकेला शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनीही अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही. यातच इंग्लंडच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेबद्दल भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाने 375 धावांचे लक्ष्य देऊन रचला इतिहास
पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाविरुद्ध 375 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. क्रिकेट इतिहासात वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध केलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
भारतीय संघाचा दारुण पराभव
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली. अष्टपैलू हार्दिक पंड्या (90 धावा) आणि सलामीवीर शिखर धवन (74 धावा) या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठा डाव खेळण्यात यश आले नाही. त्यामुळेच भारतीय संघाचा 66 धावांनी पराभव झाला.
भारताचा तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत होईल पराभव – मायकेल वॉ
इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉ यांचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलिया दौर्यावर विराट कोहलीच्या नेतृत्वखालील भारतीय संघाचा तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत पराभव होईल. वॉ यांनी शुक्रवारी ट्विट केले की, ”या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघाला तीनही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत पराभूत करेल.”
Early call … I think Australia will beat India this tour in all formats convincingly … #AUSvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 27, 2020
भारतीय संघ जुन्या मानसिकतेचा
भारतीय संघाने पाच गोलंदाजांना संधी देण्याची योजना वॉ यांना आवडली नाही. याबाबत बोलताना त्यांनी ट्विट केले की, “भारतीय संघ जुन्या मानसिकतेचा वाटतोय. संघात फक्त 5 गोलंदाज आहेत आणि खोलवर फलंदाजही नाही.”
This Indian ODI team is to old school for me …. Just 5 bowling options & the batting isn’t deep enough !!! #AUSvsIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 27, 2020
ऑस्ट्रेलियन संघ विलक्षण
या सामन्याबद्दल अधिक बोलताना वॉ यांनी आणखी एक ट्विट केले की, “भारताचा ओव्हर रेट खूप खराब होता.खेळाडूंचा हावभाव रक्षात्मक होता. क्षेत्ररक्षण माझ्यासाठी धक्कादायक होते आणि गोलंदाजीही साधारण होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू विलक्षण होते.”
India’s over rate is appalling … !!! Body language defensive … fielding is my standard (shocking) … Bowling ordinary !!! Aussies on the other hand have been outstanding … Long tour for India me thinks … #AUSvIND @FoxCricket @cricbuzz !!!
— Michael Vaughan (@MichaelVaughan) November 27, 2020
तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेल.
वनडे मालिकेनंतर 3 सामन्यांची टी20 मालिका होईल आणि त्यानंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असा’ कारनामा करणारा फर्ग्यूसन न्यूझीलंडचा केवळ दुसराच गोलंदाज
“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न
…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी






