---Advertisement---

“मला खर काय आहे ते माहीत आहे,” बॉल टेंपरींग प्रकरणात डेविड वॉर्नरच्या मॅनेजरचा मोठा खुलासा

On: मंगळवार, मे 18, 2021 11:52 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २०१८ मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रकार घडला होता. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहे. कॅमरुन बेनक्राफ्टने केलेल्या केलेल्या खुलास्यानंतर या प्रकरणाच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेल्या डेविड वॉर्नरच्या मॅनेजरने देखील मोठा खुलासा केला आहे.

डेविड वॉर्नरचा मॅनेजर जेम्स एर्स्किन याने सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “त्यावेळी या प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला, परंतु सर्व खेळाडूंची मुलाखत घेण्यात आली नव्हती. संपूर्ण प्रकरणाची खिल्ली उडविली गेली होती. परंतु जे काही सत्य आहे ते बाहेर येईल आणि मला सत्य माहित आहे. पण यामुळे काहीच साध्य होणार नव्हते. कारण ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी काही काळासाठी संघाला नापसंती दर्शवली होती.”

कायदेशीर कारवाई केली असती तर…
तसेच ते पुढे म्हणाले की, “डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि बेनक्राफ्ट यांना अन्यायकारक वागणूक दिली गेली. या प्रकरणाचे सत्य हे आहे की त्यांनी चुकीचे केले. परंतु त्यांना जी शिक्षा झाली, ती त्यापेक्षा अधिक चुकीची होती. माझ्या मते त्यापैकी एक-दोन जणांवर कायदेशीर कारवाई केली असती तर या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर आले असते.”

काय म्हणाला होता बेनक्राफ्ट
ऑस्ट्रेलियातील एका मुख्य वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बेनक्राफ्ट म्हणाला होता की, “दक्षिण आफ्रिकेत झालेली ती घटना दुर्देवी होती. या प्रकरणी आम्ही तिघे दोषी ठरलो. मात्र, या प्रकरणाची कल्पना संघातील गोलंदाजांंना होती. मी जे केले त्याची जबाबदारी स्वत: घेतो. मी तेव्हा अधिक जागरूक असतो तर, ही घटना टाळता आली असती.”

आपले म्हणणे पुढे नेताना बेनक्रॉफ्ट म्हणाला होता की, “मी खूप दु:खी झालो होतो. मी एक असे काम केले, ज्यामुळे खेळाच्या मूल्यांना तडा गेला. मी या आघाडीवर सुधारणा करू इच्छितो. मी अद्याप एकही शतक झळकावले नाही. मात्र, मी ते पूर्ण करु शकलो असतो.”

डेविड सेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया
सिडनी मॉर्निंग हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक डेविड सेकर यांनी म्हटले होते की,” त्या वेळी नक्कीच बर्‍याच गोष्टी चुकीच्या ठरल्या.या बाबतीत अनेकांनी टीका केली होती. बर्‍याच लोकांना दोष दिला जाऊ शकतो. मलाही दोष देता येईल. हे इतर कोणीही असू शकते. हे रोखता आले असते पण तसे झाले नाही जे दुर्दैवी होते.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारताने जिथे विश्वचषक जिंकला, त्याच वानखेडे स्टेडियमचे तौक्ते वादळाने केले हाल; पाहा व्हायरल फोटो

दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० विश्वचषक खेळण्यापासून राहू शकतो वंचित, जाणून घ्या कारण

कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यापुर्वी टीम इंडियाला दिलासा, ‘हा’ प्रमुख खेळाडू सुटला कोरोनाच्या तावडीतून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---