ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आपला शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळणार आहे. पाकिस्तान संघ सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेतील हा तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना वॉर्नरसाठीही नेहमी लक्षात राहणारा ठरले. या सामन्याआधी वॉर्नरने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. यावेळी त्याला बॉल टॅम्परिंग प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारला, गेला जो सलामीवीर फलंदाजाला अपेक्षित होता.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि बॉल टॅम्परिंग (ball tampering) प्रकरण 2018 साली चांगलेच गाजले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केप टाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून बॉल टॅम्परिंगचे आरोप केले गेले, जे पुढे सिद्ध देखील झाले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी सोमवारी (1 जानेवारी) वॉर्नर पत्रकार परिषदेला हजर राहिला. यावेळी त्याने वनडे क्रिकेटमधून आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या वॉर्नरला अनेक प्रश्न विचारले गेले. बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा प्रश्न देखील वॉर्नरला विचारला गेला. या प्रश्नावर वॉर्नरने कुठलाच पश्चाताप होत नाही, असे थेट उत्तर दिले.
‘कुठलाच पश्चाताप वाटत नाही’
डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, “मला कुठलाच पश्चाताप नाहीये. मी बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या खूप पुढे आलो आहे. बंदी उढल्यानंतर जेव्हा संघात पुनरागमन केले, तेव्हा पूर्ण उत्साहाने आणि जबाबदारीने 100 टक्के योगदान दिले.” दरम्यान, 2018 साली ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांनी बॉल टॅम्परिंग केले होते. या तिघांनी या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर दोन्ही ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर ठराविक काळासाठी बंदी घातली गेली होती.
डेव्हिड वॉर्नर याच कारणास्तव एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट केळला नव्हता. याविषयी वॉर्नर म्हणाला, “ते एक वर्ष सोपे नव्हते. पण पत्नी कँडिस आणि आपल्या जवळच्या लोकांकडून साथ मिळाली. तसेच एका वर्षाच्या विश्रांतीमुळे आधीपेक्षा चांगला बनलो.”
दरम्यान, वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर ऑस्ट्रेलियन सलामीवीर 111 कसोटी, 161 वनडे आणि 99 टी-20 आंतराष्ट्रीय सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 8695, वनडे क्रिकेटणध्ये 6932 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2894 धावा केल्या आहेत. (David Warner’s statement on the ball tampering case)
महत्वाच्या बातम्या –
David Warner Retired । वॉर्नर निवृत्तीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? जाणून घ्या दिग्गजाचा प्लॅन
दिग्गजाने 2023 चा ‘ब्रेकआउट परफॉर्मर’ म्हणून केली गिलची निवड, कौतुक करत सांगितली मोठी गोष्ट