मुंबई | प्रो-कबड्डी २०१८च्या लिलावात आज दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागल्या आहेत. काही खेळाडूंना त्यांच्या बेस प्राईजमध्ये संघांनी विकत घेतले आहे.
काल कोटी रुपयांची उड्डाने घेणाऱ्या संघांकडे आज खेळाडूंवर बोली लावायला मोठी रक्कम नव्हती. त्यामुळेही अनेक खेळाडू अतिशय कमी किंमतीत आज संघानी आपल्या ताफ्यात घेतले आहेत.
कोणत्या संघाने किती प्लेअर आतापर्यंत घेतले संघात-
जयपुर-११
हरियाणा- १२
बेंगलोर- १३
युपी- १३
बंगाल- १४
पाटणा- १४
पुणे- १४
तमिल- १४
दिल्ली- १५
गुजरात- १७
मुंबई- १७
दुपारच्या सत्रात बोली लागलेले खेळाडू-
ऋतुराज कोरावी- ३०.४० लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
विकास काळे- २७.४० लाख, पटणा पायरेट्स
विनोद कुमार- २०.२ लाख, पुणेरी पलटण
सचिन विठ्ठल- २० लाख, गुजरात फॉर्च्युनजाएंट
सचिन कुमार- १९.२० लाख, युपी योद्धाज
राजेश नरवाल- १६ लाख,दबंग दिल्ली
बाजीराव होडगे- १४.६० लाख, जयपूर पिंक पँथर्स
विजीन थंगादुराई- ८.४० लाख, बंगाल वॉरियर्स
आदिनाथ गवळी- ८ लाख, यू मुम्बा
महेंद्रसिंह ढाका- ८ लाख, बंगळुरु बुल्स
सी. मनोज कुमार- ८ लाख, तेलगू टायटन्स
संदीप- ८ लाख, बंगळुरु बुल्स
अनिल कुमार- ८ लाख, दबंग दिल्ली
जवाहर विवेक- ८ लाख, बंगळुरु बुल्स
भुपिंदर सिंह- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
नरेंद्र- ८ लाख, युपी योद्धाज
महेश मारुती मगदुम- ८ लाख, बंगळुरु बुल्स
विट्टल मेटी- ८ लाख, बंगाल वॉरियर्स
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
–आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली








