ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज रिकी पाँटिंग यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२१) मध्ये भाग घेण्यास पाठिंबा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी ही एक आदर्श तयारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील. तर टी-२० विश्वचषक १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान होईल. दोन्ही स्पर्धा यूएईमध्ये खेळल्या जातील.
‘क्रिकेट.कॉम.एयू’ने पाँटिंगचा हवाला देत सेन रेडिओवर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनशी बोलताना म्हटले की, “ज्या खेळाडूंनी गेले तीन-चार महिने खेळले नाही, त्यांना जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळून लयीमध्ये येण्याची गरज आहे. जगातील सर्वात मजबूत देशांतर्गत टी-२० स्पर्धेत खेळण्याची संधी मिळवून समान परिस्थितींमध्येही त्यांची सर्वोत्तम तयारी होईल यात शंका नाही.”
वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौऱ्यातून बाहेर गेलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आपल्या गर्भवती पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी आयपीएलमध्ये खेळेल याची अपेक्षा नाही. कारण पुन्हा सुरू होणाऱ्या स्पर्धेच्या मध्यातच त्यांचे मूल जन्माला येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कमिन्स त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला होता की, “या हंगामाच्या उत्तरार्धात तेथे पोहोचणे खूप कठीण होईल. पाहूया गोष्टी कशा चालतात. पण यावेळी कदाचित ते खूप कठीण असेल. मात्र, त्यानंतर लगेच टी-२० विश्वचषक सुरू होईल, मला आशा आहे की मी त्यासाठी तयार होईल.”
या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरीही त्याला बरे होण्यासाठी अजून १० आठवडे लागतील. यामुळे विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सुपर १२ टप्प्यातील पहिल्या सामन्यापर्यंत तो खेळू अनुपलब्ध असेल.
रिले मेरिडिथ, डॅन ख्रिश्चन, मोईसेस हेन्रिक्स, मिशेल मार्श, ॲडम झांपा, अँड्र्यू टाय आणि जोश फिलिप हे खेळाडू वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते. या सर्वांचे आयपीएल संघांशी करार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू पुन्हा उतरणार मैदानात; टी२० विश्वचषकात ‘या’ संघाचे करणार प्रतिनिधित्व
युवा यष्टीरक्षक ईशानला धोनीकडून शिकायची आहे ‘ही’ गोष्ट, स्वत:च केला खुलासा






