दिल्ली कॅपिटल्सचा आक्रमक फलंदाज रोवमन पॉवेल याच्याकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या षटकात विजयासाठी आवश्यक ३६ धावा करण्याची अपेक्षा होती. त्याने अपेक्षेप्रमाणे सलग ३ षटकारही मारले होते. परंतु पुढे नो बॉलचा विवाद ओढावला आणि त्याची लय तुटली. परिणामी दिल्लीने १५ धावांनी तो सामना गमावला. आता या प्रकरणी पॉवेलने प्रतिक्रिया दिली आहे.
राजस्थानविरुद्ध (DC vs RR) विसाव्या षटकात ओबेद मॅककॉयच्या पहिल्या ३ चेंडूंवर पॉवेलने सलग ३ षटकार मारले होते. परंतु पॉवेलच्या मागणीनंतरही पंचांनी तिसरा चेंडू नो बॉल (No Ball Issue) न दिल्याने कर्णधार रिषभ पंतने चिडून खेळाडूंना बाहेर बोलावले. तसेच प्रशिक्षक प्रविण आमरेंनी मैदानात जाऊन याबाबत पंचांकडे जाब मागितला. सामन्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजले होते.
आता या प्रकरणी प्रतिक्रिया देताना पॉवेल (Rowman Powell) म्हणाला की, “ही एक अशी गोष्ट आहे, ज्याला आपल्याला शक्य तितक्या लवकर मागे साेडावे लागते. आम्हाला अजून खूप सामने खेळायचे आहेत. त्यामुळे भूतकाळावर जास्त लक्ष देण्यात कसलाही अर्थ नाही. आयपीएलमधील पुढच्या बादफेरीच्या टप्प्यात प्रवेश मिळवण्यासाठी आम्हाला भविष्याकडे पाहावे लागेल.”
मॅककॉयला अखेरच्या षटकात षटकार मारण्याबद्दल पॉवेल (Rowman Powell On No Ball Issue) म्हणाला की, “मी आश्वस्त होतो. मला पहिल्याच चेंडूनंतर असे वाटले होते की मी असे करू शकतो. पण मला आशा होती की, तो नो बॉल होता. परंतु पंचांचा निर्णय अंतिम असतो. आम्हालाही एक क्रिकेटपटू म्हणून पुढे जावे लागेल.”
नक्की काय घडले शेवटच्या षटकात?
विजयासाठी शेवटच्या षटकात दिल्लीला ३६ धावांची आवश्यकता होती. राजस्थानचा ओबेद मॅककॉय गोलंदाजीसाठी आला, तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी रोवमन पॉवेल होता. षटकातील सुरुवातीचे तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकले आणि संघाला विजयाची आशा निर्माण झाली. यादरम्यान मॅककॉयने टाकलेल्या तिसऱ्या चेंडूमुळे हा वाद झाला. त्याने हा चेंडू फुलटॉस घेकला होता आणि तो नो बॉल असू शकत होता. परंतु पंचाने त्याला नो बॉल करार दिला नाही. याच कारणास्तव कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) चांगलाच संतापला आणि त्याने खेळपट्टीवरील त्यांच्या फलंदाजांना मैदान सोडण्याचा इशारा देखील दिला.
दिल्लीच्या डग आऊटमधून नो बॉलची मागणी केली जात होती, पण पंचांनी तिसऱ्या पंचाकडे विचारणा न करता निर्णय दिला. त्यावेळी जोस बटलर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता आणि त्याने पंतला समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, दिल्लीचा प्रशिक्षक शेन वॉटसनने देखील पंतला समज दिली. त्यानंतर संघाचे प्रशिक्षक प्रवीण आमरे मैदानात धावत गेले आणि त्यांचा संघ खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. पॉवेल सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या वादानंतरच्या तीन चेंडूवर त्याला कमाल करता आली नाही. शेवटच्या तीन चेंडूवर त्याने अवघ्या २ धावा केल्या. परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराट फलंदाजीत फेल, पण फिल्डिंगमध्ये तेज! बोल्टचा कॅच घेताना दाखवली चित्त्यासारखी चपळाई
‘तीन-चार फ्रँचायझी खोटे बोलल्या, त्यांनी धोका दिला’, हर्षल पटेलचा मोठा खुलासा