दिल्ली। आज आयपीएलचा पहिला सामना दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होणार आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे. जर मुंबईने या सामन्यात विजय मिळवला तर ते थेट प्लेआॅफमध्ये प्रवेश करतील आणि राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्लेआॅफचे दरवाजे बंद होतील.
दिल्ली या आधीच प्लेआॅफच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
आज 11 जणांच्या संघात दोन्ही संघांनी एकमेव बदल केले आहेत. मुंबईमध्ये मिशेल मॅक्लेघनला खांद्याच्या दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले आहे.
त्याच्या एेवजी मुस्तफिझुर रेहमानला संधी देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत आवेश खान ऐवजी लियाम प्लंकेटला संधी मिळाली आहे.
आज आयपीएल 2018 च्या साखळी फेरीतील शेवटचे सामने होणार आहेत. यानंतर 22 मे पासून प्लेआॅफचे सामने होतील.
असे आहेत 11 जणांचे संघ:
दिल्ली डेयरडविल्स: पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, विजय शंकर, अभिषेक शर्मा, हर्षल पटेल, अमित मिश्रा, लियाम प्लंकेट, संदीप लॅमिचाणे, ट्रेंट बोल्ट
मुंबई इंडियन्स: सूर्यकुमार यादव, एविन लुईस, इशान किशन, रोहित शर्मा, कृणाल पंड्या, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, बेन कटिंग, मयंक मार्कंडे, जसप्रित बूमराह, मुस्तफिझुर रेहमान
महत्त्वाच्या बातम्या-
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू
–धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!
–राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार