Dean Elgar Retirement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊन येथे खेळला जाणार आहे आणि हा सामना दक्षिण आफ्रिकेचा हंगामी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज डीन एल्गर याचा कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना असेल. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने डीन एल्गरचे खूप कौतुक केले आहे आणि या सामन्यात एल्गरला लवकरात लवकर बाद करायला आवडेल असे म्हटले आहे. रोहित शर्माच्या मते, “डीन एल्गरची विकेट खूप मौल्यवान आहे आणि तो सहजासहजी बाद होत नाही.”
सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात डीन एल्गर (Dean Elgar) याने जबरदस्त शतक झळकावले होते. एल्गरने 287 चेंडूत 28 चौकार मारत 185 धावांची खेळी खेळली होती. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यातही त्याला अशीच खेळी खेळायला आवडेल.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने डीन एल्गरबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “डीन एल्गर गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख खेळाडू आहे. तो आमच्याविरुद्ध खूप धावा करतो आणि तो जबरदस्त खेळाडू आहे. त्याला त्याच्या विकेटचे महत्त्व कळते आणि तो सहजासहजी बाद होत नाही. जर आम्ही त्याला लवकर बाद केले तर आमच्यासाठी खूप चांगले होईल. एल्गरची विकेट किती महत्त्वाची आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याला मोठ्या खेळी खेळायला आवडतात. आम्ही एक योजना तयार केली आहे आणि आशा आहे की, ती कार्य करेल.”
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. मात्र, आता दुसरी कसोटी जिंकून रोहित शर्मा आणि कंपनी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायचा प्रयत्न करतील. (IND vs SA Rohit Sharma’s Big Statement on South African Captain Said He is very much against us)
हेही वाचा
T20 World Cup 2024: बीसीसीआय टेन्शनमध्ये! रोहित-विराटला खेळायचाय 2024 टी20 विश्वचषक
AUS vs PAK: फेअरवेल कसोटीत वॉर्नर आपल्या मुलींसह उतरला मैदानात; टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले स्टेडियम, पाहा व्हिडीओ