मार्च महिन्याअंती इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची (आयपीएल २०२२, IPL 2022) सुरुवात होणार आहे. २६ मार्च ते २९ मे दरम्यान आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. या हंगामासाठी वेळापत्रकही जाहीर झाले आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी सर्व खेळाडू या टी२० लीगसाठी तयारीला लागले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याने त्याच्या संघ सहकाऱ्यांना आयपीएलऐवजी राष्ट्रीय सेवेला प्राधान्य देण्याचे (Dean Elgar On IPL 2022) आवाहन केले आहे.
बांगलादेशचा संघ मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा (Bangladesh Tour Of South Africa) करणार आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ सामन्यांची वनडे आणि २ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. १२ एप्रिल रोजी हा दौरा संपेल. परंतु याचवेळी आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असलेले दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या मालिकांमध्ये अनुपलब्ध राहू (South African Players Absence Against Bangladesh) शकतात. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
जर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएलसाठी निघून गेले, तर एल्गारच्या नेतृत्त्वाखालील कसोटी संघ बांगलादेशविरुद्ध कमजोर पडेल. मात्र क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने खेळाडूंवर जास्त दबाव न टाकता, त्यांना आयपीएल २०२२ मध्ये खेळणे किंवा बांगलादेशविरुद्ध खेळणे, यापैकी कोणताही पर्याय निवडण्याची मुभा दिली आहे. क्रिकइंफोने याबद्दल माहिती दिली आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार एल्गारने म्हटले आहे की, “खेळाडूंनी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला संकेत देण्याची गरज आहे की, ते आयपीएलसाठी जाणार आहेत की कसोटी संघात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत?. खेळाडूंसाठी हा निर्णय घेणे जरा कठिण आहे. पण मला वाटते की, ही अशी वेळ आहे, जिथे खेळाडूंची ईमानदारी तपासता येते. खेळाडूंनी हे विसरले नाही पाहिजे की, कसोटी क्रिकेट किंवा वनडे क्रिकेटनेच त्यांना आयपीएलमध्ये जागा मिळवून दिली आहे. इतर कोणत्या कारणामुळे आयपीएल फ्रँचायझींकडून ते करार प्राप्त करू शकलेले नाहीत.”
दक्षिण आफ्रिकेचे १० पेक्षा जास्त खेळाडू आयपीएलचा आहेत भाग
आयपीएलच्या येत्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ११ खेळाडूंचा समावेश आहे. कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, एन्रिच नॉर्किया आणि मार्को जेन्सन यांसारखे प्रतिभाशाली आणि शानदार प्रदर्शन करणारे खेळाडू आयपीएलचा भाग आहेत. तसेच ऍडम मार्करम, रासी वॅन डर डूसेन, डेविड मिलर, डिवाईन प्रिटोरियस आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक हे देखील आयपीएल २०२२ साठी वेगवेगळ्या फ्रँचायझीचा भाग आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ
‘बाप’माणूस गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नासाठी झटलेली स्नेह राणा आता बनलीय टीम इंडियाची ‘संकटमोचक’
कोहलीचं ‘विराट’ मन! १०० व्या कसोटीनंतर विराटची दिव्यांग चाहत्याला जर्सी भेट, व्हिडिओनी जिंकली मने