---Advertisement---

‘चाहर फॅमिली’त लवकरच वाजणार सनई चौघडे, ‘या’ तारखेला राहुल प्रेयसीसंगे बांधणार लग्नगाठ

On: मंगळवार, मार्च 8, 2022 1:49 PM
Rahul-Chahar-&-Girlfriend
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज राहुल चाहर (Rahul Chahar) हा त्याच्या गोलंदाजी व्यतिरिक्त सोशल मिडियावरील फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असतो. परंतु तो सध्या एका वेगळ्याच कारणावरुन चर्चेत आहे. तो त्याची गर्लफ्रेंड ईशानी जौहर हिच्यासोबत ९ मार्चला गोव्यामध्ये लग्न करणार आहे. या दोघांनी दोन वर्षांपुर्वी जयपुरमध्ये साखरपूडा केला होता. हे दोघे खुप काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याला खूप खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे.

डेस्टिनेशन वेडींगसाठी राहुलचे कुटूंब गोव्याला रवाना झाले आहे. पश्चिम गोव्यामध्ये स्थित असलेल्या हाॅटेलमध्ये दोघांच्या लग्नाचे विधी मंगळवारपासून (८ मार्च) सुरु होणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे, तर ९ मार्चला दूपारी हळदी आणि संध्याकाळी लग्न सोहळा पार पडेल. संध्याकाळी उरलेले विधी होतील आणि १२ मार्चला आग्रा येथील हाॅटेलमध्ये रिसेप्शन असणार आहे.

https://www.instagram.com/p/CZ8ivFxBTbC/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय संघ सध्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. गोवामध्ये पार पडणाऱ्या चाहरच्या विवाह सोहळ्यात आणि आग्रा येथे  असणाऱ्या रिसेप्शनसाठी अनेक खेळाडू आणि आयपीएल फ्रॅंचायझी हजर राहण्याची शक्यता आहे. राहुल चाहरचा चुलत भाऊ दीपक चाहर सरळ गोव्याला पोहचणार आहे. चाहरच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांना लागली होती, ती आता लवकरच पुर्ण होणार आहे.

https://www.instagram.com/p/CaaP2C7h7FA/?utm_source=ig_web_copy_link

राहुल चाहरने भारतीय संघासाठी आत्तापर्यंत १ एकदिवसीय सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ५४ धावा देत ३ विकेट घेतल्या आहेत. २३ जूलै २०२१ रोजी श्रीलंका संघाविरुद्ध त्याने हा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारताच्या एकदिवसीय संघात अजूनही स्थान दिले नाही. तसेच तो भारतासाठी ६ टी२० सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. तो २०१९ वर्षापासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने या टी२० लीगमध्ये ४२ सामन्यांत ४३ विकेट घेतल्य़ा आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी २७ धावा देत ४ विकेट घेतलेली होती. त्याला २०२२ च्या आयपीएल हंगामात पंजाब किंग्सने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

फलंदाजीत तर तुलना होतेच, पण आता पाकिस्तानच्या आझमची गोलंदाजीतही विराटची कॉपी, पाहा व्हिडिओ

‘मी त्याला का अडवू? माझी वेळ गेली आहे’, अश्विनने विक्रम मोडल्यानंतर कपिल देवची प्रतिक्रिया

जेव्हा गांगुलीशी शर्यत हारल्यानंतर वॉर्नला घालावी लागली होती कट्टर प्रतिद्वंद्वी इंग्लंडची जर्सी, वाचा तो किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---