मुंबई । ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू डीन जोन्स यांनी संघाला उंचीवर नेणार्या भारतीय खेळाडूचे कौतुक केले आहे. जोन्स म्हणतात की हा खेळाडू असा आहे की त्याच्या विषयी राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही बोलत असतात. जोन्स यांचे हे वाक्य दुसर्या कोणाबद्दल नसून एमएस धोनीलाबद्दल आहेत.
जोन्स म्हणाले की, “पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या लांब केसांची प्रशंसा करतानाचा क्षण धोनीचा आवडता क्षण होता. प्रत्येक खेळाडूची ती स्टाईल असते. त्या खेळाडूंविषयी राष्ट्रपती आणि पंतप्रधान देखील चर्चा करत असतात. तो सर्वांचा आवडता खेळाडू आहे.”
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना जोन्स म्हणाले, “परवेझ मुशर्रफ यांनी देखील धोनीला केस न कापण्याचा सल्ला दिला होता. कारण तो त्या लांब केसांमध्ये खूप सुंदर दिसतो.”
धोनीची प्रशंसा करताना ते पुढे म्हणाले, “धोनी हा खेळ चांगल्याप्रकारे समजतो. त्याला खेळाची ताकद माहित आहे. त्याच्या खेळाडूंना तो पाठिंबा देत असतो. तो कोणत्याही प्रकारचा क्षुल्लक निर्णय घेत नाही. शांत राहण्यास पंसत देतो. या गुणांमुळेच धोनी क्रिकेटच्या मैदानावर अतिशय शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून ओळखला जातो. ”
धोनीने आपल्या कर्तृत्वाने मोठे नाव कमावले. एक खेळाडू म्हणून त्याने अफाट यश मिळवले आहे. तो एक सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून मोठा झाला आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये त्याने यश मिळवले. धोनीच्या भविष्याविषयी बरेचसे अनुमान बांधले जात आहेत. 2019च्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो एकही सामना खेळला नाही. तसेच त्याने त्याच्या भविष्याबद्दल कोणालाही सांगितले नाही.