मेलबर्न। शनिवारपासून(२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात झाली. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे दिवंगत क्रिकेटपटू डिन जोन्स यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेलबर्न हे जोन्स यांचे घरचे मैदान होते.
या मैदानावर जोन्स यांनी कारकिर्दीतल्या ५२ कसोटी सामन्यांपैकी ६ कसोटी सामने खेळले होते. तसेच ४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले या मैदानात त्यांनी खेळले होते. जोन्स यांचे याचवर्षी मुंबईत २४ सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. विशेष म्हणजे त्यांनंतर मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच त्यांना अंतिम निरोपही देण्यात आला होता.
ऑस्ट्रेलिया-भारत सामन्यावेळी अनोखी श्रद्धांजली –
शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यादरम्यान दुसऱ्या सत्रानंतर जोन्स यांना विशेष श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जोन्स यांची पत्नी जेन आणि दोन्ही मुली-ऑगस्टा आणि फोबे उपस्थित होत्या. त्यांनी मैदानावर येत जोन्स यांची कुकाबुराचे स्टिकर लावलेली बॅट स्टम्पचा आधार घेत उभी केली. तसेच बॅटवर त्यांची बॅगी ग्रीन कॅप ठेवली आणि बॅटच्या शेजारी त्यांचा गॉगलही ठेवला.
त्यानंतर काही वेळाने भारताचा १२ वा खेळाडू केएल राहुल आणि ऑस्ट्रेलियाचा १२ वा खेळाडू जेम्स पॅटिन्सनने मैदानावर येत या वस्तू बाहेर नेल्या.
A wonderful tribute to an Aussie legend.
Rest easy, Deano ???? #AUSvIND pic.twitter.com/X8aeQsYhRV
— cricket.com.au (@cricketcomau) December 26, 2020
Dean Jones' wife and daughters paid tribute to the Australia legend at his beloved MCG today ❤️ pic.twitter.com/LkA9Yl66Fn
— ICC (@ICC) December 26, 2020
जोन्स करणार होते आयपीएल १३ चे समालोचन –
जोन्स इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामासाठी स्टार स्पोर्ट्सच्या समालोचन टीमशी संबंधित होते आणि ते त्यासाठी मुंबईत होते. जेव्हा जोन्स यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यावेळी त्यांच्याच देशाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली त्यांच्या जवळ होता. त्याने सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही.
जोन्स यांची कारकिर्द –
डिनो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने ५२ कसोटी आणि १६४ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या २१६ होती आणि वनडेत १४५ ही त्यांची सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४६.५५ च्या सरासरीने ३६६१ धावा केल्या, ज्यामध्ये ११ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे सामन्यात जोन्स यांनी ४४.६१ च्या सरासरीने ६०६८ धावा केल्या, ज्यामध्ये ७ शतके आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे.
जोन्स यांनी २४५ प्रथम श्रेणी सामन्यांत १९१८८ धावा केल्या. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दोन दुहेरी शतकेही ठोकली होती, १९८६ मध्ये त्यांनी चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथे भारताविरुद्ध २१० धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात जन्मलेल्या इंग्लंडच्या क्रिकेटरचे निधन; घेतल्यात हजाराहून अधिक विकेट्स
‘बॉक्सिंग डे’ कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
व्वा! संघनायक असावा तर असा, ‘त्या’ एका कृतीने अजिंक्य रहाणेने जिंकली कोट्यवधी क्रिकेट रसिकांची मने






