---Advertisement---

‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा

---Advertisement---

भारतीय संघाकडून 18 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूमध्ये 59 धावा काढल्या. ईशान किशन हा टी20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात अर्धशतक करणारा जगातील दुसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला. या सामन्यानंतर ईशान किशनने त्याच्या पहिल्या चेंडूवरील षटकाराबद्दल मोठा खुलासा केला आहे.

हा सामना संपल्यानंतर ‘चहल टीव्ही’वर मुलाखत देताना सांगितले की, तो पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा निर्णय घेऊनच तो मैदानात गेला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर युजवेंद्र चहलने दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

चहलशी बोलताना ईशानने सांगितले की, ‘माझ्या बाजूने खूप गोष्टी होत्या. माझा वाढदिवस होता, मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत होतो. 50 षटकांच्या सामन्यात यष्टिरक्षणानंतर मला हे समजले की, कोलंबोची खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत करत नाहीये. मी तुम्हा सगळ्यांना (भारतीय खेळाडू) सांगूनच गेलो होतो की, गोलंदाज कोणी का असेना आणि चेंडू कसा का येईना, मी पहिल्या चेंडूवर षटकार मरणारच.’

चहलने ईशानला विचारले की, ‘तू प्रत्येक चेंडूला फटका मारायच्या प्रयत्नात होतास. पण हा तुझा पदार्पणाचा वनडे सामना होता, मग तुझ्यावर सामन्याबाबत कोणताही दबाव नव्हता का?’ यावर ईशानने उत्तर दिले की, ‘मला वाटते सराव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आम्ही या विकेटवर सराव करत होतो. त्यामुळे मला माहित होतं की मी चांगली फलंदाजी करू शकेल. चेंडू चांगला कनेक्ट होत होता. म्हणून मी वेगळा विचार केला नव्हता, मी काही वेगळी योजनाही केली नव्हती. मला फक्त इतकेच करायचे होते की, जर चेंडू माझ्या जवळ आला की, शॉट मारायचा.’

https://www.instagram.com/p/CRenqRjNlWv/?utm_source=ig_web_button_share_sheet

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहिले की, ‘माझे स्वप्न खरे होत आहे याच्यापेक्षा चांगले अजून काहीच असू शकत नाही. भारतीय संघाची जर्सी घालणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि पाठिंब्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार. माझे फक्त एकच ध्येय आहे की खूप कष्ट घेणे आणि देशासाठी सर्वकाही देणे.’ अशाप्रकारे ईशान किशनने सर्वाचे आभार मानत पुढेही चांगली कामगिरी करण्याची ग्वाही दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

आई शप्पथ! इंग्लंडच्या ‘या’ शतकवीराने ठोकला १२२ मीटरचा गगनचुंबी षटकार, सर्वत्र रंगली एकच चर्चा

अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’

पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---