---Advertisement---

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा| डेक्कन जिमखानाचे युनायटेड स्पोर्ट्स क्लबपुढे मोठे आव्हान

---Advertisement---

पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा सध्या खेळली जात आहे. या स्पर्धेत डेक्कन जिमखानाचे (Deccan Gymkhana) युनायटेड स्पोर्ट्स क्लबपुढे 429 धावांचे आव्हान ठेवले. 
पीवायसीच्या पहिल्या डावात 270 धावा
पुणे, दि. 5 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत हर्ष सांघवी(220धावा) याने केलेल्या शानदार फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघापुढे 429 धावांचे आव्हान उभे केले. दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात साहिल चुरी(114धावा)ने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने 270धावा, तर केडन्स संघाने पूना क्लबसमोर 296धावाचे आव्हान उभे केले.

डिझायर स्पोर्ट्स मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना संघाने पहिल्या डावात 82 षटकात 8बाद 429धावा केल्या. यात हर्ष सांघवीने 181 चेंडूत 18चौकार व 13षटकारासह 220 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. त्याला अथर्व वणवेने 78 धावा करून साथ दिली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 188 चेंडूत 167 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर हर्ष याने सोहम कुमठेकर(49धावा) च्या साथीत 155 चेंडूत 166 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने आज दिवसअखेर 4 षटकात बिनबाद 9धावा केल्या. यात आदित्य राजहंस नाबाद 3, रोहित खरात नाबाद 4 धावांवर खेळत आहे.

पीवायसी हिंदु जिमखाना मैदानावरील सामन्यात पीबीकेजेसीएच्या अक्षय चव्हाण(3-25), यश खळदकर(3-69), गणेश मते(2-52), अनिकेत इंद्रजीत(2-96) यांच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डाव 70.5 षटकात सर्वबाद 270धावावर संपुष्टात आला. यामध्ये साहिल चुरीने 178 चेंडूत 22चौकाराच्या मदतीने 114 धावा करून संघाचा डाव सावरला. साहिलला सिद्धेश वीर 54, आदित्य लोंढे 40, नचिकेत वेर्लेरकर 23 यांनी धावा काढून साथ दिली. प्रत्युत्तरादाखल पीबीकेजेसीए संघाने आजदिवस अखेर 17 षटकात बिनबाद 53धावा केल्या. आयत दिग्विजय जाधव नाबाद 34, अभिमन्यू जाधव नाबाद 14 धावांवर खेळत आहे. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे. सनग्लो क्रिकेट स्टेडियमवरील सामन्यात अथर्व धर्माधिकारी(124धावा) याने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर केडन्स संघाने 65.2 षटकात सर्वबाद 296धावा केल्या. याच्या उत्तरात पूना क्लब संघ 11षटकात 5बाद 33धावा केल्या.

स्पर्धेचे उदघाटन फिल्ट्रमचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर, पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंद्रजीत कामतेकर, महेंद्र गोखले, सुरेंद्र भावे, अविनाश रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. कपिल खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी मैदान: पहिला डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 70.5 षटकात सर्वबाद 270धावा(साहिल चुरी 114(178,22×4), सिद्धेश वीर 54(52,11×4,1×6), आदित्य लोंढे 40(39,9×4), नचिकेत वेर्लेरकर 23, अक्षय चव्हाण 3-25, यश खळदकर 3-69, गणेश मते 2-52, अनिकेत इंद्रजीत 2-96) वि.पीबीकेजेसीए: 17 षटकात बिनबाद 53धावा(दिग्विजय जाधव नाबाद 34(57,7×4), अभिमन्यू जाधव नाबाद 14);

डिझायर स्पोर्ट्स मैदान: पहिला डाव : डेक्कन जिमखाना : 82 षटकात 8बाद 429धावा(डाव घोषित)(हर्ष सांघवी 220(181,18×4,13×6), अथर्व वणवे 78(112,8×4), सोहम कुमठेकर 49(99,6×4), आत्मन पोरे 2-65, निमीर जोशी 2-127, ओंकार मोहिते 2-110) वि युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 4 षटकात बिनबाद 9धावा(आदित्य राजहंस नाबाद 3, रोहित खरात नाबाद 4);

सनग्लो क्रिकेट स्टेडियम: पहिला डाव: केडन्स: 65.2 षटकात सर्वबाद 296धावा(अथर्व धर्माधिकारी 124(137,24×4), सिद्धेश वरघंटे 55(57,7×4,3×6), अनिरुद्ध साबळे 44(53,7×4, निपुण गायकवाड 25, हर्ष ओसवाल 3-57, अखिलेश गवळे 2-39) वि.पूना क्लब: 11षटकात 5बाद 33धावा(देव नवले नाबाद 10, निनाद रॉड्रिक्स नाबाद 1, इझान सय्यद 3-12, निलय सिंघवी 2-11);

बारणे अकादमी मैदान: पहिला डाव: क्लब ऑफ महाराष्ट्र: 40.1 षटकात 4बाद 157धावा(यश क्षीरसागर 45(61,7×4), राजवर्धन उंद्रे 42(49,9×4), अश्कान काझी नाबाद 23, ओंकार येवले 20, विराज दारवटकर 20, रोहित चौधरी 2-34, मिझान सय्यद 1-12) वि. डीव्हीसीए: (Deccan Gymkhana’s big challenge to United Sports Club)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात लिविंगस्टोन दुखापतग्रस्त, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून घेतली माघार
दिवंगत वॉर्नला मिळाला मानाचा पुरस्कार! क्रीडाक्षेत्रातील दिग्गजांच्या यादीत झाला समावेश 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---