पुणे, 29 डिसेंबर 2023: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए) यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीडीएफए फुटसाल लीग स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने सलग तिसरा विजय मिळवला.
बावधन येथील हॉटफूट येथील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत डेक्कन इलेव्हन संघाने चेतक एफसी संघाचा 10-6 असा पराभव केला. डेक्कन इलेव्हन संघाकडून सिओन डिसुजा(1,3,6,9मि.)ने चार गोल, शोएब बेग(2,5,7मि) ने तीन गोल, स्कॉट मॉरीस(8मि.), डॉसन रीबेलो(4मि.), यश जगताप(18मि.) यानी प्रत्येकी एक गोल केला. चेतक एफसीकडून निखील माळी( 10,12,16, 25मि.)ने सर्वाधिक चार गोल केले.
दुसऱ्या सामन्यात सिद्धांत मुखर्जी(1,2,9,10मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर रेंजहिल्स संघाने दुर्गा स्पोर्टस अकादमी संघाचा 10-6 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. अन्य लढतीत डेक्कन इलेव्हन संघाने रियल पुणे युनायटेड संघाला 4-4 असे बरोबरीत रोखले.
निकाल: साखळी फेरी:
डेक्कन इलेव्हन: 10(सिओन डिसुजा 1,3,6,9मि., शोएब बेग 2,5,7मि., स्कॉट मॉरीस 8मि., डॉसन रीबेलो 4मि., यश जगताप 18मि.) वि.वि.चेतक एफसी: 6(निखील माळी 10,12,16, 25मि., शार्दुल टी. 24, 35मि.);
रेंजहिल्स:10(सिद्धांत मुखर्जी 1,2,9, 10मि., अनिरुध्द चाको 3, 7मि., श्रीतेज इंगळे 4, 5मि,. दिवीजीत देशमुख 6, 8मि.) वि.वि.दुर्गा स्पोर्टस अकादमी: 6(नीरज माने 13, 32मि., मनीष बिष्णोई.12,14मि., प्रबोध भोसले 18, 34मि);
डेक्कन इलेव्हन: 4(यश जगताप 4, 13मि., सिओन डिसुजा 8मि., क्लिंटन 31मि.) बरोबरी वि.रियल पुणे युनायटेड:4(कुणाल देशमुख 20, 23मि., इशान शिरोडकर 12मि.,यश भोसले 32मि.)
महत्वाच्या बातम्या –
SA vs IND । टीम इंडियासाठी गुड न्यूज! केपटाऊन कसोटीत महत्वाचा खेळाडू करणार पुनरागमन
आरसीबीने ड्रॉप केलेला स्टार अष्टपैलू बनला श्रीलंकेचा कर्णधार, वाचा कधी करणार पुनरागमन