अमेरिकेत मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेटसाठी पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेत बेसबॉल हा मागच्या मोठ्या काळापासून सर्वात लोकप्रिय खेळ राहिला आहे. पण अलिकडच्या काळात अमेरिकेत बेसबॉलची लोकप्रियता कमी होताना दिसत आहे. अशात याठिकाणी बेसबॉलच्या तुलनेत क्रिकेटची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भारतीय खेळाडू राहतात आणि त्यांमुळेच क्रिकेटला देखील याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एका अहवालानुसार 2017 साली अमेरिकेत 9% लोकांना बेसबॉल खेळ आवडत होता. हीच संघ 1937 मध्ये 34% टक्के होती. युवकांमध्ये केवळ 7% लोकसंखा बेसबॉलला त्यांचा आवडता खेळ मानतात. 2019 ते 2021 दरम्यान, मेजर लीग बेसबॉलच्या प्रेक्षकसंख्येत 12% घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बोसबॉलची कमी होत असलेल्या लोकप्रियतेचे एक प्रमुख कारण समोर आले आहे. 1937 साली बेसबॉलचा सामना 2 तासांचा होता. पण आज हा सामना संपण्यासाठी 3 तास लागतात.
तसेच अमेरिकेत भारतीय आणि जगभारातील इतर देशांतलील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे सर्वजण देखील बेसबॉलच्या तुलनेत क्रिकेटला त्यांचा आवडता खेळ मानणारे आहेत. अमेरिकेत 46 लाख भारतीय आणि 10 लाख लोक इतर देशांतील आहेत, जे क्रिकेटला फॉलो करतात. तसेच याठिकाणी राहणारी भारतीय लोकसंख्या समृद्ध आहे आणि क्रिकेटमध्ये गुंतवणूक देखील करत आहेत. अमेरिकेत मुळचे भारतीय असलेले अनेक दिग्गज आणि बिजनेसमॅन आहेत. यात मायक्रोसॉफ्ट आणि एडोबी सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या भारतीयांची नावे देखील आहेत.
जुलै 2023 मध्ये अमेरिकेत सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. लीगची सुरुवात करण्यासाठी 364 कोटी रुपये खर्च झाले असून अजून 625 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एमएलसी अमेरिकेत युवा खेळाडूंना सराव देत आहेत. देशात भारतीयांसह दक्षिण आशियाई आणि वेस्ट इंडीजची लोकसंख्या जास्त असल्यामुळे लीगला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा सर्वांनाच आहे. एमएलसीचा पहिला हंगाम 13 जुलै ते 30 जुलै 2023 दरम्यान खेळला जाणार आहे.
यूएसए क्रिकेटच्या माहितीनुसार अमेरिकेत दोन लाख खेळाडू 4000 स्थानिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळत असतात. अमेरिकेच्या पुरुष, महिला आणि 19 वर्षांखालील संघात बहुतांश खेळाडू दक्षिण आशियाई आणि वेस्ट इंडियन आहेत, जे सध्या अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. एमएलसीचा अंदाज आहे की, लीगला टीव्ही आणि ऑनलाईन स्ट्रिमिंगच्या माध्यमातून 50 लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक मिळतील. (Decline in popularity of baseball in America, businessman of Indian origin will invest 1000 crores for cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरांच्या चुकीने खेळाडूची कारकीर्द लागली पणाला! चुकवली महत्त्वाची शस्त्रक्रिया?
अपघातग्रस्त पंतवर भडकला माजी दिग्गज! म्हणाला, ‘ड्रायव्हरचा खर्च तर नक्कीच उचलू शकतोस’