आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत मंगळवारी (२६ ऑक्टोबर) वेस्ट विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगतदार सामना पार पडला. हा सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ला समर्थन करण्यास नकार देत, गुडघ्यावर बसण्यास देखील नकार दिला होता. त्यानंतर त्याने सामन्यातून माघार घेतली होती. हा सामना झाल्यानंतर वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने या घटनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडिज संघाला या सामन्यात ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना झाल्यानंतर कायरन पोलार्ड म्हणाला, “मी वैयक्तिकरित्या आणि एक संघ म्हणून वर्णद्वेष संपवण्यासाठी आपले योगदान देत राहील. वैयक्तिकरित्या मला असा कुठलाच खेळाडू माहीत नाही ज्याने असे (गुडघ्यावर बसण्यास) करण्यास नकार दिला आहे. ही माझ्यासाठी फक्त एक बातमी होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “तुम्हा लोकांना या विषयावर आमचे मत माहीत आहे. आम्ही एक संघ म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही याच बाजूने आहोत आणि आम्ही ते करत राहू.” गतवर्षी मे महिन्यात अमेरिकेत पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्यापासून जगभरातील खेळाडूंनी गुडघे टेकून वर्णद्वेषाविरुद्धच्या या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा जोरदार विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर वेस्ट इंडिज संघाकडून प्रथम फलंदाजी करताना एविन लुईसने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर कायरन पोलार्डने २६ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला ८ बाद १४३ धावा करण्यात आले होते. या धावांचा पाठलाग करताना एडेन मार्करमने नाबाद ५१ धावांची खेळी केली. तर, रासी वान दर डूसेनने नाबाद ४३ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना ८ गडी राखून जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
वाढदिवस विशेष: कसोटी सामन्याच्या पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा एकमेव अवलिया, पाहा व्हिडीओ