जेव्हापासून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड पुरुष क्रिकेट संघांनी पाकिस्तानला त्यांच्यात घरात कसोटी मालिकेत पराभव केला, तेव्हापासून अनेक गोष्टी बदलताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांनी अध्यक्षांना गृहीत धरत मोठा आदेश जाहीर केला आहे. बोर्डाने चेतावणी देताना म्हटले, ‘सर्वांनी 30 ते 40 टक्के पगार कपातीला तयार राहा. नाहीतर घरी जा.’ रमीझ राजा यांना नुकतेच पीसीबीच्या अध्यक्षपदावरून काढले आहे. आता हा आदेश जाहीर झाल्यानंतर कोणता पाकिस्तानी अधिकारी राजीनामा देणार की नाही हे कळेलच.
रमीझ राजा (Ramiz Raja) यांना अध्यक्षपदावरून काढल्यानंतर व्यवस्थापक कमिटीने पीसीबीची जबाबदारी घेतली. तसेच पीसीबीचे नवे अध्यक्ष म्हणून नजम सेठी आहेत. यानंतर कमिटीने अनेक संचालक अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे. त्यांची पगार कपात होणार हे आधीच त्या अधिकाऱ्यांना सुचित केले आहे, असे कमिटीने म्हटले आहे. जर त्या अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला तर त्यांना 3 महिन्यांचा पगार दिला जाईल, असेही कमिटीने आधीच सांगितले आहे. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) फैजल हसनैन यांना महिन्याचा 9.50 लाख रुपये पगार दिला जातो. यानांही पगार कपातीबाबत सतर्क केले आहे.
पीसीबीच्या अधिकाऱ्यांचा भरमसाट पगार पाहून सेठी यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या मते पगार कमी केले नाही तर पीसीबीची तिजोरी लवकरच रिकामी होईल.
पाकिस्तानच्या सर्व अधिकाऱ्यांचा पगार लाखांमध्ये
पीसीबाचे चीफ फाइन्शियल ऑफिसर जावेद मुर्तजा यांना जवळपास 5 लाख रुपये, डायरेक्टर हाय परफॉर्मेंस नदीम खान यांना 5.50 लाख, डायरेक्टर इंटरनेशनल क्रिकेट ऑपरेशस झाकिर खान यांना 3.50 लाख, डायरेक्टर इंफ्रास्ट्रक्चर ऍंड रियल स्टेट नासिर हमीद यांना 3.20 लाख, डायरेक्टर मीडिया समी अल हसन यांना 4.75 लाख आणि चीफ मेडिकल ऑफिसर नजीबुल्लाह यांना महिन्याचे 4.30 लाख रुपये पगार मिळतो.
यावरून पीसीबीमध्ये पुढील 7 ते 10 दिवसांत आणखी काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. झाकिर हे 3 एप्रिलला निवृत्त होणार आहे. तसेच बोर्डच्या नव्या अधिकाऱ्यांनी ज्युनियर टी20 लीग बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे बोर्डला जवळपास 36 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गौतम गंभीरने भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाला सुनावले खडे बोल, म्हणाला ‘ तुम्ही फक्त…’
धोनी कुटुंबाने नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गाठली दुबई, मुलीसोबतचा व्हिडिओ आला समोर