टी२० विश्वचषक. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदद्वारे (आयसीसी) आयोजित करण्यात येणाऱ्या या विश्वस्तरीय स्पर्धेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युएई आणि ओमानमध्ये टी२० विश्वचषक २०२१ चे सामने रंगणार आहेत. मात्र तीन महिन्यांपुर्वी पासूनच या विश्वचषकासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत.
यावर्षी मायभूमीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली सलामी फलंदाजाच्या भूमिकेत होता. रोहित शर्मासोबत मिळून त्याने संघाला भक्कम सुरुवात करुन दिली होती. यावेळी येत्या टी२० विश्वचषकातही आपण सलामीला फलंदाजी करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. याबाबत आता भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी आपले मत मांडले आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करताना समालोचक दीप दासगुप्ता म्हणाले की, “टी२० विश्वचषकावेळी विराट सलामीला फलंदाजीसाठी येण्याची शक्यता आहे. कारण त्याने मागील मालिकेवेळीच उल्लेख केला होता की, तो रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याच्या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करत आहे. परंतु तत्पुर्वी त्याला अनुभवी सलामीवीर केएल राहुलच्या फॉर्मचा विचार करावा लागणार आहे. जर राहुल पुन्हा आधीसारख्या फॉर्ममध्ये परतला; तर विराटने सलामीला फलंदाजी करू नये. रोहित आणि राहुल ही सलामी जोडी असावी आणि विराटने त्याच्या तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करावी.”
थोडक्यात सांगायचे झाले तर, दीप दासगुप्ता यांच्या मते, टी२० विश्वचषकात रोहित आणि राहुलची सलामी जोडी धमाकेदार प्रदर्शन करू शकते. जर राहुलने तत्पुर्वीच्या सामन्यांमध्ये विशेष फलंदाजी केली नाही. तरच विराटने सलामीला फलंदाजी करण्याचा विचार करावा.
यष्टीरक्षक फलंदाज राहुल सध्या भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यादरम्यान त्याला अपेंडिक्सचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला ऑपरेशनही करावे लागले होते. परंतु आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेद्वारे राहुल पुन्हा लयीत येण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकावेळी भारत अडचणीत असताना ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो कर्णधार कोहलीची जागा
आऊटस्विंगर की इनस्विंगर? इंग्लिश गोलंदाजाच्या चतुर गोलंदाजीने गोंधळला फलंदाज, ‘अशी’ गमावली विकेट