---Advertisement---

जेमतेम १७ आयपीएल मॅचेस खेळलेला खेळाडू करतोय भारताकडून पदार्पण

On: रविवार, जुलै 8, 2018 6:26 PM
---Advertisement---

ब्रिस्टल। 11 वर्षांपूर्वी ज्या खेळाडूला भारताचे माजी वादाग्रस्त प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी क्रिकेट सोडून द्यायचा सल्ला दिला होता आज तोच खेळाडू भारताच्या संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.

भारतीय संघ रविवारी 8 जुलैला इंग्लंड विरुद्ध निर्णायक टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मध्यमगती गोलंदाज दिपक चहरला 11 जणांच्या भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. त्याला त्याच्या पदार्पणाची कॅप भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते देण्यात आली आहे.

चहर भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा एकूण 359 वा, तर टी20 मध्ये पदार्पण करणारा भारताचा 76 वा खेळाडू ठरला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने त्याचा बदली खेळाडू म्हणून चहरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.

त्याची यावर्षीची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही चांगली राहिली आहे. तसेच आयपीएलच्या 11 व्या मोसमात दीपक चहरने 12 सामन्यात 10 विकेट्स मिळवले आहेत.

त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघातही निवड झाली होती. या दौऱ्यात त्याने 6 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघ रविवारचा सामना जिंकून पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी20 मालिका विजयास उत्सुक असेल. 3 सामन्याची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीची आहे.

कोण आहे दीपक चहर-

दीपक चहर आयपीएलमध्ये 17 सामने खेळला आहे. त्याने 17मे 2016 ला आयपीएल पदार्पण केले होते तर शेवटचा सामना तो 27 मे 2018रोजी वानखेडेवर खेळला आहे.

17 सामन्यात त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये हा खेळाडू राजस्थान, पुणे आणि चेन्नई संघाकडून खेळला आहे.

देशांतर्गत क्रिकेट हा खेळाडू राजस्थान संघाकडून खेळतो. त्यात त्याने प्रथम श्रेणीच्या 40 सामन्यात 113 तर अ दर्जाच्या 15 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

-गेली काही वर्ष अपयश पाहिलेल्या सुरेश रैनासाठी आजचा दिवस खास

-शिखर धवनला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा करण्याची संधी

-Video: कोण आहे तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू; जो गातो हिंदी कव्वाली!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment