भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर तब्बल ६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. दीपकसाठी गेले काही महिने कठीण गेले. दुखापतीमुळे दीपक आयपीएल २०२२मध्येही तो खेळू शकला नाही. आता त्याने त्याच्या आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडिया पेजवर त्याच्या पुनरागमनाची कहाणी शेअर केली आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये चहरने सांगितले की तो त्याच्या दुखापतीतून कसा बरा झाला आणि यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल उत्सुक आहे. दीपक चहर म्हणाला की, “बर्याच दिवसांनी चेन्नईत परतणे चांगले आहे. या शहराने मला इतकं दिलं आहे की ते घरासारखं वाटतं. मला झिम्बाब्वेला जाण्यापूर्वी इथे सराव करायचा होता. मला येथे सराव करायचा होता. जेव्हा तुम्ही दुखापतीतून पुनरागमन करता तेव्हा थेट मैदानात उतरून १०० टक्के देणे इतके सोपे नसते. तुम्हाला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी लय मिळेल.”
मला संघासाठी सामने पूर्ण करायचे आहेत: दीपक
दुखापत होण्यापूर्वी चहर केवळ गोलंदाजाच्या भूमिकेत संघासाठी महत्त्वाचा नव्हता, तर त्याने फलंदाजीसह अनेक प्रसंगी महत्त्वाच्या खेळीही खेळल्या आहेत. तो त्याच्या फलंदाजीलाही गांभीर्याने घेत आहे. तो म्हणाला की, “माझी मानसिकता नेहमीच सारखीच राहिली आहे. मला फलंदाजीची संधी मिळाली तर मी फलंदाजी करेन आणि संघाला सामने जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी आठव्या क्रमांकावर खेळतो आणि त्या क्रमांकावरील खालच्या फलंदाजांकडून फारशी मदत मिळत नाही. खेळ संपवणे हे माझे काम आहे कारण ही जबाबदारी सांभाळणारे माझ्या खाली कोणी नाही. तो दबाव हाताळणे कठीण आहे, परंतु लोक तुम्हाला एक नायक म्हणून लक्षात ठेवतात.”
Anbuden is where the heart belongs! ????
Getting up close and candid with Cherry on his road to recovery ! ????➡️#WhistlePodu #Yellove ????????@deepak_chahar9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 11, 2022
‘माझ्यासाठी पाच महिने खूप कठीण होते’
दुखापतीबाबत हा अष्टपैलू खेळाडू म्हणाला की, “ते ५ महिने खूप कठीण होते. आधी हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. त्यानंतर माझी दाताची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पाठीचे दुखणे सुरू झाले, ज्याला बरे होण्यासाठी ८ आठवडे लागले. जेव्हा मी माझ्या दुखापतीमधून सावरत होतो तेव्हा मला पाठीला दुखापत झाली. त्यानंतर मला पुन्हा दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया करावी लागले. भारतासाठी विश्वचषक खेळणे आणि देशासाठी सामने जिंकणे हे माझे सुरुवातीपासूनच स्वप्न होते.”
दरम्यान, दीपक चहरला बॅकअप पर्याय म्हणून आशिया कप संघात ठेवण्यात आले आहे. त्याने झिम्बाब्वेमध्ये चांगली कामगिरी केल्यास आशिया चषकासाठी तो आवेश खानची जागा घेऊ शकतो. सध्या तरी दीपक चाहर किती फिट आहे आणि कसे प्रदर्शन करेल यावर कोणीही ठामपणे उत्तर देऊ शकत नाही. दीपककडे चांगली प्रतिभा आहे पण मोठ्या कालावधीपर्यंत क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करणे तितके सोपे नसते. त्यामुळेच आता दीपक चाहर कशा प्रकारे पुनरागमन करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतात झिम्बाब्वेचे ‘हे’ दोघे खेळाडू, एकट्याने ठोकलीत सलग २ शतके
‘भारताविरुद्ध सामना खेळताना दबाव असतो!’ पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने केले स्पष्ट
आशिया चषकापूर्वी सूर्यकुमार यादवने घेतली लक्झरी कार, किंमत ऐकुण तुम्हीही व्हाल हैरान