आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी बुधवारी (12 ऑक्टोबर) समोर आली. वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीच्या कारणास्तव आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात दीपक चाहर राखील खेळाडूंमध्ये होता. आता त्याच्या जागी शार्दुल ठाकुर या संघासोबत राखीव खेळाडूच्या रूपात ऑस्ट्रेलियाला जाईल.
दरम्यान, चाहर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील टी-20 मालिकेत तिन्ही सामन्यांमध्ये खेळला. मोठ्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संघात पुनरागमन केले. त्याने आशिया चषकातही एका सामन्यात तो खेळताना दिसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे 2, 0, आणि 1 अशा विकेट्स घेतल्या. आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत देखील त्याला निवडले गेले होते. पण अचानक दुखापत झाल्याचे समोर आले आणि त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली.
आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात दीपक चाहर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर या चौघांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. आता या चौघांपैकी दीपक चाहर दुखापतीमुळे विश्वचषकात खेळू शकणार नाही. चाहरच्या जागी शार्दुल ठाकुर () राखीव खेळाडू्ंमध्ये सहभागी होईल. माध्यमांतील वृत्तानुसार, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज गुरुवारी (13 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, त्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि आता दीपक चाहरच्या रूपात संघाला तिसरा मोठा झटका मिळाला आहे. बुमराह विश्वचषकात खेळणार नसल्यामुळे राखीव खेळाडूंपैकी एक त्याची जागा भरणार असल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजमध्ये बुमराहची जागा घेण्यासाठी स्पर्धा दिसते. लवकरच आता त्यांची जागा कोण घेणार, हे देखील समजेल. विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबरला सुरू होणार असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ते पुन्हा आलेत! मालिका जिंकताच गब्बर सेनेचा ‘बोलो तारारारा’; पाहा भारी व्हिडिओ
दिल्ली काबीज करत टीम इंडियाचा मोठा कारनामा! चालू वर्षात सोडली नाही एकही ट्रॉफी