आयपीएल 2021 मध्ये शुक्रवार (16 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यात सीएकेचा गोलंदाज दीपक चहरच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे पंजाब संघाने लोटांगण घातले. वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय उपयोगी ठरला. सीएसकेच्या शानदार गोलंदाजीपुढे पंजाब संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 106 धावा करू शकला.
या सामन्यात शानदार गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 13 धावा देऊन 4 गडी बाद करणाऱ्या दीपक चहरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. सामन्यानंतरच्या सादरीकरणात त्याने मला संघातील अकराही खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजाला पाहायचे असल्याचे भाष्य केले आहे.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा मी मयंक अगरवालचा बळी घेतला तेव्हा मी सर्वाधिक आनंद लुटला असे मला वाटते. चेंडू स्विंग करून बरोबर यष्टीवर लागणे हे एका गोलंदाजासाठी स्वप्नवतचं असते. पहिल्या षटकात ऋतुराज गायकवाडकडे गेलेला झेल हा खूप वेगवान होता आणि तो झेल फक्त जडेजासारखा क्षेत्ररक्षक पकडू शकतो. मी त्यावेळी विचार करत होतो की जडेजा तिथे असायला पाहिजे होता. तो जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असून त्याने माझ्या चेंडूवर बरेच झेल पकडले आहेत. त्यामुळे मला मैदानावरील सर्व अकराही खेळाडूंमध्ये जडेजाला पाहायचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘वडिलांचा पैसा वाया घालवतेस,’ म्हणणाऱ्या महिलेची सचिनच्या लेकीने ‘अशी’ केली बोलती बंद
क्रिकेटपटू कम गुरू! सामन्यानंतर शाहरुखने घेतली धोनीची भेट; चाहते म्हणाले, ‘मास्टर माही’
सामना सुरू असताना धोनीने शाहरुखच्या कानात काय सांगितले होते? खुद्द ‘थाला’नेच केला खुलासा