टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात असतो. अशात अनेकदा फलंदाज स्वस्तात विकेट गमावतात. जर फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असेल, तर अर्धशतक करतो, परंतु टी-२०त शतक करणे वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. असे खूप खेळाडू असतील, ज्यांचे टी-२० क्रिकेटमध्ये शतक करण्याचे स्पप्न कधीच पूर्ण झाले नाही. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवख्या असलेल्या दीपक हुड्डा याने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक ठोकले.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) यापूर्वी फक्त ४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता. आयर्लंडविरुद्ध मंगळवारी (२८ जून) खेळला गेलेला दुसरा सामना हुड्डाच्या कारकिर्दीतील पाचवा टी-२० सामना होता, ज्यामध्ये त्याने शतकी खेळी केली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ५७ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावांची तुफानी खेळी केली. हुड्डा या प्रदर्शानंतर दिग्गजांच्या यादीत सहभागी झाला आहे. तो चौथा असा खेळाडू बनला आहे, ज्याने टी-२० आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक ठोकले आहे.
भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत सर्वात पहिले नाव माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याचे आहे. दुसऱ्या क्रमांकावर सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल (KL Rahul) आहे, जो आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत सहभागी नाहीये. यादीत आता चौथ्या क्रमांकावर दीपक हुड्डा नव्याने सहभागी झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारे भारतीय खेळाडू
सुरेश रैना
रोहित शर्मा
केएल राहुल
दीपक हुड्डा
दरम्यान, या सामन्याचा विचार केला, तर भारताने जबरदस्त फलंदाजी केली. हार्दिक पंड्या या मालिकेत भारताचा कर्णधार आहे आणि त्याने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ७ विकेट्सच्या नुकसानावर २२५ धावा केल्या.
या धावा करण्यासाठी हुड्डाचे योगदान सर्वात मोठे राहिले. त्याने अवघ्या ५७ चेंडूत १८२.४५ च्या स्ट्राईक रेटने १०४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. संजू सॅमसन मोठ्या काळानंतर या सामन्यात भारतासाठी खेळला आणि चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला. त्याने ४२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा केल्या. या दोघांच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने ही मोठी धावसंख्या उभी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एक आक्रमक तर दुसरा शांत, ‘या’ ३ गोष्टी राहुल द्रविड आणि ब्रेंडन मॅक्क्यूलमला करतात वेगळ्या
जबरदस्त फॉर्मात असलेले इंग्लंडचे ‘हे’ फलंदाज भारतासाठी ठरतील कर्दनकाळ! दोघांनीही नुकतीच केलीत २ शतके