आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी२० सामना दीपक हुड्डा याच्यासाठी अतिशय खास राहिला. कारकिर्दीतील केवळ पाचवा टी२० सामना खेळत असलेल्या हुड्डाची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली आणि त्याने शानदार शतक नोंदवले. हे शतक त्याच्यासाठी सर्वार्थाने खास राहिले. तसेच त्याच्या शतकी खेळीसह एक खास योगायोगही जुळून आला आहे.
या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत हुड्डाने (Deepak Hooda) विस्फोटक शतकी खेळी केली. ५७ चेंडू खेळताना १८२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने १०४ धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ६ षटकार आणि ९ चौकार निघाले. अशाप्रकारे हुड्डाने आयर्लंडविरुद्ध त्याच्या टी२० आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील (First Century In Career) पहिले शतक ठोकले.
याबरोबरच हुड्डाचे हे शतक भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावले गेलेले १०० वे शतकही (Hundredth Century For India) ठरले आहे. अर्थातच हुड्डा भारतीय संघाकडून शतक करणारा शंभरावा क्रिकेटपटू बनला आहे.
भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलेवहिले शतक लाला अमरनाथ यांनी केले होते. दिवंगत भारतीय क्रिकेटपटू अमरनाथ यांनी त्यांच्या कसोटी पदार्पणात शतकी तडाखा लावला होता. डिसेंबर १९३३ साली इंग्लंडविरुद्ध त्यांनी कसोटी सामन्यात ११८ धावांची खेळी केली होती. तर डब्ल्यू व्ही रमण हे भारतीय संघाकडून ५० वे शतक करणारे फलंदाज आहेत. त्यांनी १९९२ मध्ये हे शतक केले होते.
याव्यतिरिक्त हुड्डाची ही खेळी आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमध्ये एखाद्या भारतीय खेळाडूकडून केली गेलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.
आयर्लंडविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणाऱ्या भारतीयांचा विचार केला, तर १०४ धावांसह दीपक हुड्डा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा ९७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ७७ धावांसह संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सॅमसनने या धावा मंगळवारच्याच सामन्यात केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ७४ धावांसह शिखर धवन आहे. ७० धावांसह केएल राहुल पाचव्या आणि ६९ धावांसह सुरैश रैना सहाव्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! आजवर ११ हजार टी२० खेळल्या गेल्या, पण ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा भारतीय संघ पहिलाच
एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू
दीपक हुड्डाचं वादळ, टी२०त अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत शतक; बनला सर्वात वेगवान सेंचूरी करणारा चौथा भारतीय