वेस्ट इंडीजविरुद्ध भारताच्या मायदेशातील आगामी टी-२० आणि एकदिवसीय मालिकेची सुरुवात फ्रेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने बुधवारी (२६ जानेवारी) या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात भारताच्या युवा खेळाडूंना संधी दिल्याचे पाहायला मिळाले. दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. दरम्यान, मागच्या वर्षी हुड्डाला कृणाल पांड्यासोबतच्या वादामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून बडोदा संघाने निलंबीत केले होते. पण आता परिस्थिती अशी आहे की, कृणाल पांड्या भारतीय संघातून बाहेर आहे, तर हुड्डाने मात्र संघात पुनरागमन केले आहे.
मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेदरम्यान हुड्डा आणि कृणालचा वाद समोर आला होता. याच कारणास्तव बडोदा संघाने त्याला स्पर्धेतून निलंबीत केले होते. आता जानेवारी २०२२ मध्ये मात्र त्याने भारतीय संघात दुसऱ्यांदा स्थान बनवले आहे. हुड्डाला यापूर्वी २०१७-१८ मध्ये भारतीय संघात निवडले गेले होते, पण मैदानावर खेळण्याची संधी मात्र त्याला मिळाली नव्हती. आता तब्बल पाच वर्षांनंतर त्याने भारतीय संघात स्थान बनवले आहे आणि यावेळी त्याला खेळण्याची संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय ।