इंडीयन प्रिमीयर लीग २०२२ (indian premiere league 2022) चा १५ वा हंगाम लवकरच सुरु होत आहे. आयपीएल प्रमुखांच्या मते, हा हंगाम मार्चच्या शेवटच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव बॅंगलोर येथे १२ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे. लिलवासाठी १२१४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मेगा लिलावापुर्वी ३३ खेळाडू १० संघांमध्ये रिटेन आणि ड्राफ्ट म्हणून सामील झाले आहेत. उर्वरित खेळाडूंना मेगा लिलावात खरेदी केले जाणार आहे. या मेगा लिलावात खालील चार यष्टिरक्षकांवर आयपीएल फ्रँचायझी पाण्यासारखा पैसा ओतताना दिसू शकतात. या लेखात आपण त्या युवा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत…
सध्या चेन्नई सुपर किंग्जकडे एमएस धोनी, दिल्ली कॅपिटल्सकडे रिषभ पंत आणि राजस्थान रॉयल्सकडे संजू सॅमसन यष्टिरक्षक म्हणून आहेत. परंतु, याशिवाय यावर्षी नवीन दोन संघ वाढले असून आणखी सात संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहेत. त्या संघांना सुद्धा एका चांगल्या यष्टिरक्षकाची गरज आहे. त्यामुळेच मेगा लिलावात काही यष्टीरक्षकांची चांदी होणार असल्याचे दिसत आहे.
व्हिडिओ पाहा- आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय
१. क्विंटन डी कॉक (Quinton De Kock)
या यादीत पहिले नाव क्विंटन डी कॉकचे आहे. दक्षिण आफ्रिकेचा महान यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक हा एक मजबूत यष्टीरक्षक फलंदाज आहे. डी कॉक मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून यशस्वी ठरला आहे. गेल्या अनेक हंगामात तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत ७७ आयपीएल सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत १३० च्या स्ट्राइक रेटने २२५६ धावा केल्या आहेत. पण आता मुंबई इंडियन्सशिवाय त्याच्यावर अनेक संघांचे लक्ष असणार आहे.
२. ईशान किशन (Ishan Kishan)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे ईशान किशन. जो आयपीएलच्या मेगा लिलावात मोठ्या रकमेत विकला जाऊ शकतो. तो आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी खेळला असल्याने प्रथम मुंबई इंडियन्स त्याच्यासाठी बोली लावू शकते तर लखनऊ आणि अहमदाबादच्या फ्रँचायझींनाही त्याला संघात घ्यायला आवडेल. तसेच बाकी संघांमध्ये सुद्धा या यष्टीरक्षक फलंदाजाला विकत घेतले जाऊ शकते. त्याने ६१ सामन्यात १३६ च्या स्ट्राईक रेटने १४५२ धावा केल्या आहेत.
३. जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)
इंग्लंडचा वेगवान फलंदाज जॉनी बेअरस्टो या सर्वोत्तम यष्टिरक्षकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक मोसमात तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. बेअरस्टो या लिलावात आघाडीवर असणार आहे. लिलावात या यष्टीरक्षकावर पैशांचा पाऊस खुप पडणार आहे, कारण तो सामना विजेता ठरला आहे आणि सर्वाधिक धावा काढण्यासाठी ओळखला जातो. त्याने २८ सामन्यात १४२ च्या स्ट्राइक रेटने १०३८ धावा केल्या आहेत.
४. श्रीकर भरत (Srika Bharat)
या यादीतील चौथे नाव आहे श्रीकर भरत. त्यालाच केएस भरत म्हणून सुद्धा ओळखतात. भरत हा फक्त एक मजबूत यष्टिरक्षकच नाही तर एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. जो वरच्या फळीपासून मधल्या फळीपर्यंत फलंदाजी करू शकतो आणि संघासाठी धावा करू शकतो. गेल्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला होता आणि त्याने ७ डावात १९१ धावा केल्या होत्या. गतवर्षी प्रमाणे यंदाही आरसीबी त्याला संघात घेईल, परंतु लिलावात आणखी बरेच संघ त्याच्यासाठी बोली लावताना दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पुष्पा फिव्हर! ‘श्रीवल्ली हुक स्टेप’ करत शाकिबने केले विकेटचे सेलिब्रेशन, व्हिडिओ बघतच राहाल
विराटचं मन वळविण्याचा प्रयत्न सुरू, आयपीएल २०२२ मध्ये पुन्हा स्विकारू शकतो आरसीबीचे नेतृत्त्व
हेही पाहा-