मंगळवारी (२८ जून) हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील भारताचा युवा संघ आयर्लंडविरुद्धचा सलग दुसरा टी२० सामना जिंकला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आयर्लंडचे खेळाडू जिंकण्यासाठी झुंज देत होते, पण अखेर भारताने ४ धावा शिल्लक ठेवून विजय मिळवला. नवख्या दीपक हुड्डा याने या सामन्यात शतक ठोकले. सोबतच हुड्डा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारती ठरला आहे.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) भारताचा चौथा असा फलंदाज ठरला आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये शतक ठोकले. यापूर्वी फक्त सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुल अशी कामगिरी करू शकले होते. हुड्डाने या सामन्यात ५७ चेंडू खेळले आणि १०४ धावांची खेळी केली. या धावा करण्यासाठी त्याने ९ चौकार आणि ६ षटकार ठोकले. आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यांमध्ये एखाद्या भारतीय खेळाडूकडून केली गेलेली ही सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता.
आयर्लंडविरुद्ध सर्वात मोठी खेळी करणाऱ्या भारतीयांचा विचार केला, तर १०४ धावांसह दीपक हुड्डा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रोहित शर्मा ९७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ७७ धावांसह संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सॅमसनने या धावा मंगळवारच्याच सामन्यात केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ७४ धावांसह शिखर धवन आहे. ७० धावांसह केएल राहुल पाचव्या आणि ६९ धावांसह सुरैश रैना सहाव्या क्रमांकावर आहे.
आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
१०४ – दीपक हुड्डा
९७ – रोहित शर्मा
७७ – संजू सॅमसन
७४ – शिखर धवन
७० – केएल राहुल
६९ – सुरेश रैना
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, सॅमसन आणि हुड्डाच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ७ विकेट्सच्या नुकसनावर २२५ धावा केल्या. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचे सलामीवीर पॉल स्टार्लिंग (४०) आणि अँडी बालबिर्नी (६०) धावा केल्या. हॅरी टेक्टरनेही महत्वाच्या ३९ धावा केल्या. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत झगडून देखील त्यांना विजय मिळवता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
निर्विवाद वर्चस्व! भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला आयर्लंड विरूद्धचा शेवटचा सामना
दीपक हुड्डाचे शतक, संजू सॅमसनची वादळी खेळी; भारताचे आयर्लंडसमोर २२८ धावांचे भलेमोठे आव्हान