---Advertisement---

गोंधळच गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात दोन्ही फलंदाज धावले एकाच एंडला, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पंजाब किंग्ज विरूद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करतांना २० षटकांत ७ बाद १६६ धावा केल्या.
मात्र या डावात पंजाबचा फलंदाज दीपक हुड्डा विनोदी पद्धतीने बाद झाला. सहकारी खेळाडूसह धाव घेण्याबाबत गोंधळ झाल्याने दोन फलंदाज एकाच एंड कडे धावल्याचे यावेळी दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे.

दीपक हुड्डा आणि मयंक अगरवालचा झाला गोंधळ
या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुल अपेंडिक्सच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत मयंक अगरवालकडे नेतृत्वाची धुरा होती. फलंदाजीत मयंकने ही जबाबदारी पार पाडत आघाडीवर राहून नेतृत्व केले. त्याच्या ५८ चेंडूतील ९९ धावांच्या नाबाद खेळीने पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मात्र दीपक हुड्डासह त्याच्या धाव घेण्याबाबत झालेल्या गोंधळाने हुड्डा रन आउट झाला.

त्याचे झाले असे की, १४२व्या षटकांत दिल्लीकडून अक्षर पटेल गोलंदाजी करत होता. त्याचा तिसरा चेंडू मयंकने कव्हर्सच्या दिशेने टोलवला. मात्र तिथे उभ्या असलेल्या शिम्रॉन हेटमायरने अप्रतिम फिल्डिंग करत चेंडू अडवला. मात्र मयंक तोपर्यंत धावेसाठी पळाला होता. पण नॉन स्ट्राईकला असलेला दीपक हुड्डा चेंडू अडवला गेला आहे, हे पाहून माघारी फिरला. त्यामुळे हेटमायरने चेंडू फेकला तेव्हा गोलंदाजाच्या एंडला एकाच वेळी दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये परतण्याचा प्रयत्न करत होते. मात्र यावेळी अक्षर पटेलने प्रसंगावधान दाखवत दुसर्‍या एंडला चेंडू फेकत एक फलंदाज रन आउट होईल याची खबरदारी घेतली. तिसर्‍या पंचांनी पाहिलेल्या रिप्लेत मयंक गोलंदाजाच्या एंडला आधी क्रीज मध्ये पोहोचल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे दीपक हुड्डाला माघारी परतावे लागले.

पाहा व्हिडिओ –

पंजाबने दिल्लीला दिले १६७ धावांचे लक्ष्य
दरम्यान, पंजाबने या सामन्यात दिल्लीला १६७ धावांचे आव्हान दिले. पंजाब कडून मयंक वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मयंकने ५८ चेंडूत नाबाद ९९ धावा काढल्या. तर त्याव्यतिरिक्त केवळ डेव्हिड मलानने २६ धावा केल्या. दिल्लीकडून कॅगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल

राजस्थान संघांसाठी असा रॉयल कारनामा करणारा जोस बटलर ठरला तिसराच परदेशी

हे वाईट झालं यार! भारतीय क्रिकेटपटू अशोक दिंडाचा पराभव, पण यंदा क्रिकेटच्या नाही तर राजकारणाच्या मैदानात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---