तुम्हाला जर क्रिकेटमध्ये समालोचन करायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही असे भाष्य टेनिस क्रिकेट समालोचक दिपक मंडले यांनी केले आहे. ते शनिवारी महा स्पोर्ट्सच्या फेसबुक लाईव्हवर चाहत्यांशी बोलत होते.
२०१२पासून टेनिस क्रिकेटमध्ये काम करणाऱ्या मंडलेंनी यावेळी टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, टेनिस क्रिकेटमध्ये जर समालोचन करायचे असेल तर तुम्हाला सतत तुमचा दर्जा इतरांपेक्षा उच्च ठेवावा लागतो. हे करताना तुमच्याकडे कष्ट घेण्याची ताकदही लागते व तुमच्याकडे सातत्याचीही गरज पाहिजे.
टेनिस क्रिकेटमधील तुमची ड्रीम ११ कोणती या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मला तसे १०० हुन अधिक खेळाडू आवडतात. यातून केवळ ११ खेळाडू निवडणे अतिशय कठीण आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये सतत वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत असतात.
मंडले हे माजी टेनिस क्रिकेटपटूही राहिले असून फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यांनी १९९९ ते २०१९मध्ये टेनिस क्रिकेटच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल भाष्य केलं तसेच पंचगिरी करणं सोप्पं नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
टेनिस क्रिकेटमधील समालोचकांमध्ये नरेश ढोमे व दिपक मंडले यांनी आतापर्यंत फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला आहे. तर रविवारी मनोज बेल्हेकर हे चाहत्यांशी संवाद साधणार आहेत.