नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय, BCCI) २०२१-२२ वर्षासाठी केंद्रिय करार (BCCI Central Contract) मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष क्रिकेटपटूंबरोबरच महिला क्रिकेटपटूंचीही केंद्रिय वार्षिक कराराची (Women Central Contract) यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत दिप्ती शर्मा (Deepti Sharma) आणि राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gaikwad) यांना फायदा झाला आहे.
भारतीय महिला संघाच्या गोलंदाज दिप्ती आणि राजेश्वरी आता अ श्रेणीमध्ये सामील झाल्या आहेत. या यादीत भारताच्या टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि पूनम यादव या पूर्वीपासून आहेत. अ श्रेणीमध्ये असलेल्या महिला क्रिकेटपटूंना वर्षाचे केवळ ५० लाख रुपये मिळतात.
तर भारताच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी या ब श्रेणीमध्ये कायम आहेत. या श्रेणीतील महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयच्या केंद्रिय वार्षिक करारात ३० लाख रुपये मिळतात. मात्र फलंदाज जेमिमाह रोड्रिगेज (Jemimah Rodrigues) हिला केंद्रिय करारात भरपूर नुकसान झाले आहे. ती ब श्रेणीतून क श्रेणीत घसरली आहे. आता तिला वर्षाचे केवळ १० लाख रुपये मिळतील.
आता ५ कोटींचे मिळणार फक्त ३ कोटी; बीसीसीआयने दिला पुजारा अन् रहाणेसह ‘या’ दोन खेळाडूंना धक्का
पुरुष क्रिकेटपटूंमध्ये पुजारा, रहाणेसहित चौघांचे नुकसान
पुरुष क्रिकेटपटूंच्या क्रेंदिय करार यादीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना केंद्रिय वार्षिक करारात नुकसान झाले आहे. या सर्वांची एक श्रेणी कमी केली गेली आहे. पुजारा आणि रहाणे यांना खराब फॉर्ममुळे ब श्रेणीमध्ये हलवण्यात आले आहे, जे आधी अ श्रेणीमध्ये होते. या दोन्ही फलंदाजांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर स्वतला सिद्ध करण्याची संधी दिली गेली होती. परंतु त्यांना तिथेही विशेष प्रदर्शन न करता आल्याने त्यांना संघाबाहेर करण्यात आले आहे. हे दोन्ही फलंदाज सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत.
दुसरीकडे, अष्टपैलू पंड्याच्या श्रेणीमध्येही मोठी घसरण झाली आहे. दुखापतीमुळे तो गेल्या टी२० विश्वचषकापासून संघातून दूर आहे. याचा फटका त्याला केंद्रिय वार्षिक करारात बसला असून त्याला अ श्रेणीतून थेट क श्रेणीत हलवण्यात आले आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज साहाला ब श्रेणीतून क श्रेणीत हलवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रैनाच्या चाहत्यांचा हार्टब्रेक! गुजरात टायटन्सने संघात सामील करून घेण्यास दिला स्पष्ट नकार
महिला विश्वचषकाचा सुरू होतोय रणसंग्राम! ‘या’ पाच भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचीच नजर
Video : ‘याला म्हणतात दर्जेदार प्रश्न’, मराठी पत्रकाराच्या प्रश्नावर कर्णधार रोहितचा ‘दिलखूश’