पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 16 वे पदक जमा झाले आहे. दीप्ती जीवनजीने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत T20 प्रकारात अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावले आहे. तिने 55.82 सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्य पदकावर निशाणा साधला आहे. दीप्ती पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. सध्याचा विश्वविक्रम तिच्याच नावावर असल्याने ती सुवर्ण जिंकण्याची प्रबळ दावेदार मानला जात होती.
महिलांच्या 400 मीटर शर्यतीत T20 प्रकारात दीप्तीने 55.82 सेकंदात शर्यत पूर्ण केली. तर 55.23 सेकंदात शर्यत पूर्ण करणाऱ्या तुर्किएच्या एसेल ओंडरने रौप्य पदक जिंकले. तसेच युक्रेनच्या युलिया शुलियरने 55.16 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. दीप्तीने शर्यतीच्या शेवटच्या क्षणांमध्ये स्वतःला खूप औढले आणि सुवर्ण जिंकण्याच्या अगदी जवळ आली. परंतु शेवटच्या 10 मीटरमध्ये युक्रेनच्या धावपटूने तिचा वेग वाढवला आणि सुवर्णपदकावर निशाणा साधला.
🥉 FOR DEEPTI JEEVANJI….!!!!!
– What a performance by Deepti in the 400m T20 final 🔥 16th medal for India in Paralympics…!!!! pic.twitter.com/hEHh1PCVtU
— Johns. (@CricCrazyJohns) September 3, 2024
पॅरा ॲथलेटिक्समधील महिलांच्या 400 मीटर शर्यतीच्या T20 प्रकारात भारताची दीप्ती सध्याची विश्वविजेती आहे. यावर्षी कोबे येथे झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. याशिवाय 2022 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. दीप्तीने पॅरालिम्पिकच्या कोणत्याही ॲथलीटीक्स स्पर्धेत भारतासाठी सहावे पदक जिंकले आहे. तिच्या आधी प्रीती पालने ऍथलेटिक्समध्ये 2 कांस्यपदके जिंकली होती. सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्ण, तर निषाद कुमार आणि योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले.
दीप्ती जीवनजीचा जन्म 27 सप्टेंबर 2003 रोजी तेलंगणातील कालेरा गावात झाला. ती केवळ 21 वर्षांची आहे. पण फार कमी कालावधीत तिने पॅरा ॲथलेटिक्समध्ये नाव कमावले आहे. दीप्तीच्या कुटुंबाचं आयुष्य खूप संघर्षमय होतं. आर्थिक विवंचनेमुळे तिच्या आई-वडिलांना अर्धा एकर जमीन विकावी लागली. मात्र या पॅरा ॲथलीटने सर्व अडचणींवर मात करत जगभरात देशाचा गौरव वाढवला आहे.
हेही वाचा-
मेहदी हसनची मन जिंकणारी कृती, मालिकावीर पुरस्काराची रक्कम ‘या’ लोकांना केली दान
यशस्वी जयस्वालच्या आयुष्यात खुलतेय प्रेमाची कळी? ‘या’ विदेशी तरुणीसोबत जोडलं जातंय नाव
बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी भारताच्या निवड समितीत मोठा बदल, ‘या’ दिग्गजाची एन्ट्री